शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

तहसीलदार, अव्वल कारकूनच जबाबदार

By admin | Updated: October 18, 2015 01:22 IST

डीडी गहाळ प्रकरण : निलंबित लिपिक सुप्रिया शिंदे यांचे म्हणणे

कोल्हापूर : मस्कत प्रशासनाकडून अपघाती नुकसान भरपाईच्या आलेल्या २३ लाख ३९ हजार २९४ रुपयांच्या ‘डीडी’ गहाळप्रकरणी सर्वसाधारण शाखेच्या तहसीलदार सुनीता नेर्लीकर व अव्वल कारकून विद्या गवारी याच जबाबदार असल्याचे खुलासावजा म्हणणे निलंबित लिपिक सुप्रिया शिंदे यांनी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्याकडे सादर केले आहे. बळीचा बकरा बनवून आपल्याला या प्रकरणात गुंतविले जात असल्याने न्याय मिळावा, अशी विनंतीही त्यांनी केली आहे. त्यामुळे लिपिक शिंदे यांच्याबरोबरच अव्वल कारकून व तहसीलदारांवर केव्हा कारवाई होणार? हे पाहावे लागणार आहे. डीडी गहाळ प्रकरणात लिपिक सुप्रिया शिंदे यांना निलंबनाचे आदेश थेट त्यांच्या घरच्या पत्त्यावर पाठविले. त्या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी आपले म्हणणे जिल्हाधिकाऱ्यांना सादर करून आपल्याला या प्रकरणात नाहक गुंतवून बळीचा बकरा केला जात असल्याचे म्हटले आहे. हा ‘डीडी’ १८ फेब्रुवारी २०१५ रोजी प्राप्त झाला होता. त्यावेळी आपल्याला कार्यरत होऊन अवघे चार ते पाच महिने झाले होते. त्यामुळे शासकीय कामाचा कोणताही अनुभव अथवा कार्यालयाची माहिती नव्हती. तसेच कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण व मार्गदर्शनही मिळाले नव्हते. या प्रकरणात कार्यालयीन प्रमुख म्हणून सर्वसाधारण शाखेच्या तहसीलदार सुनीता नेर्लीकर यांना विचारले असता त्यांनी ‘तू नवीन आहेस. त्यामुळे तुला हा विषय समजणार नाही. हा विषय तुझ्या डोक्याबाहेरील आहे,’ असे म्हटले होते. ‘तू टपालाचे काम बघ,’ असे सांगून त्या दिवशी त्यांनी आपल्याला केबिनबाहेर जायला सांगून हा विषय अव्वल कारकून गवारी यांच्याकडे सोपविला. त्यानंतर हा विषय गवारीच सांभाळत होत्या. गवारी यांनी तहसीलदार नेर्लीकर यांना ही रक्कम पहिल्यांदा जिल्हाधिकाऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याबद्दल दहा ते बारा वेळा विचारणा केली होती; परंतु त्यांनी वारसदारांची माहिती व कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी चंदगड तहसीलदारांकडून अहवाल घेण्याचे सूचित केले होते. त्यानुसार १३ मार्चला अहवाल मागणी करण्यात आली. त्यानुसार चंदगड तहसीलदारांनी ७ एप्रिलला अहवाल पाठविला. तो प्राप्त होताच ‘डीडी’ची मुदत संपणार म्हणून ही रक्कम वारसदारांना देण्याबाबत मान्यता मिळण्यासाठी मिळालेल्या सूचनेनुसार ९ एप्रिलला जिल्हाधिकाऱ्यांकडे टिप्पणी सादर केली होती. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांची सही होऊन ती सर्वसाधारण शाखेकडे ११ मे रोजी प्राप्त झाली होती. मुदत संपल्याने : गवारी यांनी डीडी नेला १२ मे रोजी आपण व अव्वल कारकून गवारी हा डीडी भरण्यासाठी स्टेट बॅँक आॅफ इंडिया, कोषागार शाखेत गेलो होतो. त्यावेळी तेथून या ‘डीडी’ची मुदत संपल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर तो डीडी गवारी या आपल्या पर्समधून घेऊन गेल्या. तेथून पुढे तो कुठे गेला हे माहीत नाही. याबाबत विचारणा केल्यावर आपल्याला उडवाउडवीची उत्तरे मिळाली. कै. नितीश यांचे वारसदार आल्यावर त्यांनी लिपिक या नात्याने माझ्याकडे बोट दाखवायला सुरुवात केली व मला यात नाहक गुंतवण्यात आले. तरी जिल्हाधिकाऱ्यांनी मला न्याय द्यावा. (प्रतिनिधी)