शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समितीमध्ये उद्भवला तांत्रिक पेच

By admin | Updated: November 12, 2014 00:16 IST

‘पणन’च्या आदेशाला उच्च न्यायालयाकडून स्थगिती

कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीवर ‘नवीन प्रशासक’ म्हणून डॉ. महेश कदम यांनी सोमवारी सूत्रे स्वीकारली. पणन संचालकांनी अशासकीय मंडळाच्या नेमणुकीला अंतरिम स्थगिती आदेश दिल्यामुळे डॉ. कदम यांना प्रशासक म्हणून पुन्हा हजर होण्याची संधी मिळाली आहे. परंतु, पणन संचालकांच्या आदेशाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे बाजार समितीमध्ये पुन्हा नवा पेचप्रसंग निर्माण झाला आहे. प्रशासकीय आणि अशासकीय मंडळाचा वाद न्यायालयीन कचाट्यात सापडला आहे. त्यामुळे बाजार समितीवर ‘कारभारी कोण’असा प्रश्न उपस्थित होत आहे. पणन संचालकांनी बाजार समितीचे प्रशासक डॉ. कदम यांना हटवून अशासकीय मंडळाची नियुक्ती केली होती. १५ जणांच्या अशासकीय मंडळाची संख्या १९ पर्यंत पोहोचली. याविरोधात शिवसेनेचे पंचायत समितीचे माजी सदस्य कृष्णात पोवार (भुयेवाडी) व भीमराव पाटील (केर्ली) यांनी पणन संचालकांकडे तक्रार केली होती. त्यावर ८ आॅगस्ट २०१४ मध्ये जिल्हा उपनिबंधकांनी अशासकीय मंडळाच्या केलेल्या नेमणुकीस डॉ. माने यांनी अंतरिम स्थगिती शुक्रवारी (दि. ७)दिली. पणन संचालकांनी दिलेल्या अंतरिम स्थगिती आदेशाच्या विरुद्ध माजी चेअरमन आर. के. पोवार, व्हाईस चेअरमन प्रा. निवास पाटील, सदस्य एम. पी. पाटील, सत्यजित जाधव आदी अशासकीय मंडळाने उच्च न्यायालयात धाव घेऊन आव्हान दिले त्याची सुनावणी झाली. उच्च न्यायालयाने आदेशालाच स्थगिती दिली आहे. त्यामुळे बाजार समितीचा कारभार उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अशासकीय मंडळाकडे जाणार की पणन संचालकांच्या आदेशानुसार डॉ. कदम कारभार चालवणार, असा नवा पेच निर्माण झाला आहे. (प्रतिनिधी)पनन संचालकांनी दिलेल्या आदेशाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे. जिल्हा उपनिबंधक कोणाचा निर्णय ग्राह्ण धरून सूत्रे देतात हे आता पाहूया. परंतु, आमची लढाई सुरूच राहणार आहे. - प्रा. निवास पाटील, माजी व्हाईस चेअरमन, बाजार समितीउच्च न्यायालयाच्या स्थगिती आदेशाची माहिती मला मिळालेली नाही. माहिती घेतो. - सुनील शिरापूरकर,जिल्हा उपनिबंधककोणाच्या निर्णयाला ‘मान’पणन संचालकांनी दिलेल्या आदेशामुळेच जिल्हा उपनिबंधक सुनील शिरापूरकर यांनी डॉ. कदम यांची प्रशासक म्हणून निवड केली. दरम्यान, आता पणन संचालकांच्या आदेशाला अशासकीय मंडळाने स्थगिती मिळवली आहे. त्यामुळे जिल्हा उपनिबंधक कोणाचा आदेश मान ठेवून बाजार समितीच्या कारभाराची सूत्रे सोपविणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहेत.