शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
2
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
6
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
7
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
8
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
9
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
10
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
11
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
12
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
13
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
14
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
15
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
16
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
17
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
18
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
19
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
20
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'

‘लोकसभे’च्या खर्चाची बिले तपासण्यासाठी लेखाधिकाऱ्यांचे पथक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 4:36 PM

लोकसभा निवडणुकीतील कामकाजासाठी वापर झालेल्या विविध घटकांच्या बिलांची तपासणी करून आठवड्याभरात पैसे अदा केले जाणार आहेत. बिले योग्य आहेत का? हे तपासण्यासाठी स्वतंत्र असे लेखाधिकाऱ्यांचे पथक नेमण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

ठळक मुद्दे‘लोकसभे’च्या खर्चाची बिले तपासण्यासाठी लेखाधिकाऱ्यांचे पथकजिल्हाधिकारी : योग्य बिले आठवड्यात देणार

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीतील कामकाजासाठी वापर झालेल्या विविध घटकांच्या बिलांची तपासणी करून आठवड्याभरात पैसे अदा केले जाणार आहेत. बिले योग्य आहेत का? हे तपासण्यासाठी स्वतंत्र असे लेखाधिकाऱ्यांचे पथक नेमण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.लोकसभा निवडणुकीच्या कामकाजासाठी दिलेल्या ट्रक, जीप, अशा सुमारे ३00 हून अधिक वाहनांचे भाड्याचे लाखो रुपये उपजिल्हा निवडणूक अधिकारी सतीश धुमाळ यांनी थकविले आहेत. भाड्याचे पैसे देण्यासाठी धुमाळ हे सही करीत नाहीत, असे निवडणूक कार्यालयातून सांगितले, असा आरोप करीत वाहनधारक सुभाष जाधव व उत्तम चव्हाण (नागाव) यांनी गेल्या आठवड्यात पालक सचिव राजगोपाल देवरा यांच्यासमोर कैफियत मांडली होती. त्यावेळी जिल्हाधिकारी देसाई हे परदेश दौऱ्यावर होते.त्यांना याबाबत विचारणा केली असता ते म्हणाले, मला या संदर्भात कोणीही भेटून सांगितलेले नव्हते. तसेच वाहनधारकांची बिले कोषागार कार्यालयात जमा झाली आहेत. तसेच बिलांबाबत निवडणूक विभागाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेले नाही. निवडणूक विभागात कर्मचारी वर्ग कमी असल्याने उर्वरित बिले तपासण्यासाठी स्वतंत्र लेखाधिकाऱ्यांचे पथक नियुक्त केले आहे. त्यांच्याकडून बिले तपासणी पूर्ण झाल्यावर आठवड्याभरात योग्य बिले संबंधितांना दिली जातील.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९collectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर