शहरं
Join us  
Trending Stories
1
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
2
Latest Marathi News LIVE Updates: मोहम्मद अय्याजला पायदळी तुडवला पाहिजे, त्याचा चौरंगा करावा; बच्चू कडू आक्रमक
3
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
4
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
5
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
6
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
7
Khaleel Ahmed: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
8
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
9
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
10
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
11
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
12
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
13
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
14
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
15
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
16
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
17
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
18
बुद्धिबळाची 'राणी'! FIDE कँडिडेट्स चेस टूर्नामेंट जिंकणारी वैशाली ठरली पहिली भारतीय महिला
19
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
20
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक केंद्रात, विद्यार्थी वाऱ्यावर

By admin | Updated: November 27, 2014 00:19 IST

पडसाळी प्राथमिक शाळा : एकच शिक्षक असल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान

राम करले- बाजारभोगाव -शासनाकडून जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांची सर्वांगीण गुणवत्ता वाढविण्यासाठी विविध योजनांवर कोट्यवधी रुपयांचा चुराडा केला जात आहे. दुसरीकडे मात्र मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष केल्याचा विरोधाभास पहावयास मिळतो. पन्हाळा तालुक्यातील पडसाळी प्राथमिक शाळेत गेल्या दोन वर्षांपासून एक शिक्षकी शाळा सुरू आहे. शैक्षणिक कामासाठी शिक्षक केंद्रात तर विद्यार्थी वाऱ्यावर अशी दयनीय अवस्था झाली आहे.पन्हाळा पश्चिम भागाच्या टोकाला घाटमाथ्यावर पडसाळी गाव आहे. येथे जिल्हा परिषदेची पहिली ते पाचवीपर्यंतची शाळा आहे. वीस विद्यार्थी आहेत. दोन वर्षांपूर्वी येथे कार्यरत असणाऱ्या शिक्षकांची बदली झाली आणि रिक्त जागा त्वरित भरण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली होती. प्रशासनाने चार महिन्यांपूर्वी एका शिक्षकाची नेमणूक केली. मात्र तो हजर झालेला नाही.येथील पाच वर्गांना शिकविण्याची तसेच मुख्याध्यापकाची जबाबदारी एकाच शिक्षकांवर आहे. पडसाळीपासून बारा किलोमीटर अंतरावर केंद्रशाळा काळजवडे असून अशैक्षणिक कामे देण्यासाठी वारंवार केंद्रात यावे लागते. मात्र विद्यार्थी लहान असल्याने किरकोळ भांडणे होण्याचे प्रसंग घडतात. त्यामुळे नाईलाजास्तव विद्यार्थ्यांची देखरेख ठेवण्यासाठी ‘कंत्राटी तत्त्वावर’ एखाद्या व्यक्तीला बसविले जाते.वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन दुसरा शिक्षक त्वरित द्यावा, अशी मागणी सरपंच पाटील यांनी केली आहे. पडसाळी शाळेत १९ आॅगस्टला दुसरा शिक्षक देण्यात आला होता. मात्र, न्यायालयीन स्थगितीमुळे संबंधित शिक्षक हजर झाला नाही. तसेच प्रशासकीय कामे केंद्रात शाळेच्या वेळेत आणून देणे, असे संबंधित शिक्षकांना सांगणे चुकीचे आहे.- एस. एम. मानकर,प्रभारी गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, पन्हाळाजिल्हा परिषदेने दुसरा शिक्षक त्वरित द्यावा, अन्यथा शाळेला टाळे ठोकण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे, याची दखल प्रशासनाने घ्यावी.- विलास कांबळे, ग्रामस्थ, पडसाळीअशैक्षणिक कामे देण्यासाठी केंद्रात वारंवार जावे लागते. कामे केंद्रात घेऊन येण्यास केंद्रप्रमुख सांगतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी एकट्याला पुरेसा वेळ मिळत नाही.- रमेश मेढेवारप्रभारी मुख्याध्यापक, वि. मं. पडसाळी