कोल्हापूर : येथील दत्त समर्थ सर्व्हिसेस फर्मचा कर सल्लागार तुषार तातोबा पाटील (वय २९, रा. बामणी, ता. कागल) याने इतरांची बिले फर्मच्या जीएसटी खात्यावर अपलोड करून ५८ लाख ८१ हजारांचा गंडा घातला. हा प्रकार एप्रिल २०२३ ते ऑक्टोबर २०२५ दरम्यान घडला. याबाबत फर्मचे प्रमुख शैलेश सुभाष जाधव (३७, रा. मंगळवार पेठ, कोल्हापूर) यांनी सोमवारी (दि. २) जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक किरण लोंढे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जाधव यांची दत्त समर्थ सर्व्हिसेस फर्म आहे. या फर्मकडून नामांकित कंपनीच्या वस्तूंची विक्री केली जाते. एप्रिल २०२३ पासून तुषार पाटील हा फर्मचा कर सल्लागार म्हणून काम करीत होता. त्याने विश्वास संपादन करून जाधव यांच्याकडून फर्मच्या जीएसटी खात्याची माहिती घेतली.पासवर्ड बदलून त्याला स्वत:चा मेल आयडी जोडला. एप्रिल २०२३ ते ऑक्टोबर २०२५ या काळात त्याने दोन कोटी १५ लाख चार हजार ७१३ रुपयांची विक्रीची बिले फर्मच्या जीएसटी खात्यावर अपलोड केली. त्यानुसार जीएसटी कार्यालयाकडून जाधव यांना ५८ लाख ८१ हजार ५०३ रुपये जीएसटी भरण्याची नोटीस आली.मोठ्या रकमेचा जीएसटी भरण्याची नोटीस येताच फर्मचे मालक जाधव यांनी जीएसटी कार्यालयात जाऊन चौकशी केली. त्यावेळी कर सल्लागार पाटील याने दत्त समर्थ सर्व्हिसेस फर्मच्या खात्यावर विक्रीची दुसरीच बिले अपलोड केल्याचे लक्षात आले. त्याने ५८ लाख ८१ हजारांचा अपहार केल्याचे स्पष्ट होताच जाधव यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिस उपनिरीक्षक अभिजित भोर अधिक तपास करीत आहेत.पासवर्ड बदललेतुषार पाटील हा बी.कॉम. झाला असून, तो कर सल्लागार म्हणून काम करीत होता. सीएंकडून केली जाणारी कामे चोख पद्धतीने करू, अशी ग्वाही त्याने फिर्यादी जाधव यांना दिली होती. मात्र, विश्वासघात करून त्याने फिर्यादींच्या जीएसटी खात्याचे पासवर्ड बदलले. त्याला स्वत:चा मेलआयडी जोडून जाधव यांना अंधारात ठेवले. जीएसटी विभागाची नोटीस आल्यानंतरच अपहाराचा प्रकार उघडकीस आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
Web Summary : Kolhapur businessman defrauded of ₹58 lakhs by tax advisor Tushar Patil. Patil changed GST account password, uploaded false bills, leading to a hefty GST notice.
Web Summary : कोल्हापुर में टैक्स सलाहकार तुषार पाटिल ने पासवर्ड बदलकर व्यवसायी को ₹58 लाख का चूना लगाया। पाटिल ने जीएसटी खाते का पासवर्ड बदला, झूठे बिल अपलोड किए, जिससे भारी जीएसटी नोटिस आया।