शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
2
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
3
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
4
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
5
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
6
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
7
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
8
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
9
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
10
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
11
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
12
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
13
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
14
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
15
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
16
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
17
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
18
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
20
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
Daily Top 2Weekly Top 5

‘भुले’बाबत डॉक्टरांशी स्पष्टपणे बोला

By admin | Updated: October 17, 2014 00:38 IST

शीतल देसाई : जागतिक भूलशास्त्र दिनानिमित्त आयोजित परिसंवादातील सूर

कोल्हापूर : भुलेविषयी रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांमध्ये नको तो गैरसमज आहे. त्यामुळे आॅपरेशनमध्ये काही धोका तर नाही ना? हमखास हा प्रश्न भूलतज्ज्ञांना भूलपूर्व तपासणीच्या वेळेस रुग्णांकडून विचारला जातो. मात्र, जरूर ती काळजी घेतल्यास सर्वसाधारण शस्त्रक्रियेमध्ये निरोगी मनुष्यास अत्यल्प धोका संभवतो. भुलेविषयी काही प्रश्न असेल तर डॉक्टरांशी मनमोकळेपणे बोला, असे आवाहन जागतिक भूलशास्त्र दिनानिमित्त इंडियन सोसायटी अ‍ॅनस्थेटिस्ट कोल्हापूर विभागाच्यावतीने आयोजित परिसंवादातून तज्ज्ञ डॉक्टरांनी केले. शाहू स्मारक भवन येथे आज, गुरुवारी आयोजित परिसंवादात डॉ. शकील मोमीन यांनी मार्गदर्शन केले. हृदयक्रिया बंद पडल्यावर आपत्कालीन स्थितीत करावयाच्या उपाययोजना याविषयीची प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. भुलीसंदर्भातील माहितीपर पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी उपस्थितांच्या शंकांचे निरसनही डॉ. देसाई यांनी केले. असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. शीतल देसाई यांनी प्रास्ताविक केले; तर डॉ. संदीप कदम यांनी आभार मानले. डॉ. स्वप्ना शिवेश्वर यांनी सूत्रसंचालन केले. या परिसंवादास संघटनेचे सेक्रेटरी डॉ. महेश म्हेतर, डॉ. आबासाहेब शिर्के, डॉ. शंकर अमणगी, डॉ. मकरंद पवार, डॉ. सुमती कुलकर्णी, डॉ. आरती जाधव, डॉ. शिरीष पवार, डॉ. अमोल कोडोलीकर, वैद्यकीय विद्यार्थी तसेच या क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)नियोजित शस्त्रक्रियेपूर्वी हे लक्षात ठेवा...ाूल देणाऱ्या डॉक्टरांना (अ‍ॅनेस्थेटिस्ट) अगोदर जरूर भेटा व आपली भीती व शंका दूर करा.आपले जुने आजार, शस्त्रक्रिया, आधीच्या भुलेबाबतचा अनुभव व सध्या चालू असलेली औषधे यांची माहिती द्या.आॅपरेशनला जाताना सैलसर, सुती व स्वच्छ कपडे घाला, डॉक्टरांच्या सर्व सूचना तंतोतंत पाळा.शस्त्रक्रियेपूर्वी किमान चार तास तोंडाने अन्नच नव्हे; पण पाण्याचा थेंबही घेऊ नका.नेल पॉलिश, लिपस्टिक, सुटा दात, कवळी, कॉन्टॅक्ट लेन्स, दागिने, बांगड्यांचा वापर आॅपरेशनच्या दिवशी टाळा. आॅपरेशनपूर्वी किमान आठवडाभर मद्य व धूम्रपान वर्ज्य करा.आॅपरेशनच्या दिवशीच ताप, सर्दी, पडसे, खोकला आल्यास डॉक्टरांना तशी कल्पना द्या.तातडीची शस्त्रक्रिया ठरल्यास रुग्णाने घेतलेले अन्न, पाणी, धूम्रपान, इत्यादींबाबत डॉक्टरांना पूर्ण कल्पना द्या. छोट्या शस्त्रक्रियेनंतर त्याच दिवशी घरी जाणार असाल तर बरोबर जबाबदार व्यक्ती असणे आवश्यक आहे.घरी गेल्यानंतर भूल देणाऱ्या डॉक्टरांना आपले क्षेमकुशल कळवा व आपला अनुभव सांगा.