शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
5
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
6
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
7
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
8
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
9
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
10
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
11
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
12
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
13
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
16
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
17
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
18
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
19
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
20
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

‘पुणेरी पलटण’ संघाचे शिरोलीत ‘टॅलेंट हंट’

By admin | Updated: November 28, 2014 00:32 IST

कबड्डी : ४ डिसेंबरला स्पर्धेचे आयोजन

सतीश पाटील - शिरोली -प्रो-कबड्डी स्पर्धेच्या दुसऱ्या हंगामासाठी पुणेरी पलटण संघाने चांगले खेळाडू शोधण्यासाठी शिरोली (पुलाची) येथील नवभारत क्रीडा मंडळाच्या मैदानावर ४ डिसेंबरला कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेतून कोल्हापूर, सांगली व सातारा या तीन जिल्ह्यांतील एकूण १४ संघ सहभागी होणार आहेत.आयपीएलच्या धर्तीवर सन २०१४ पासून प्रो-कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले गेले. पहिल्या हंगामात आठ संघांचा समावेश होता. पहिल्या हंगामात पुणेरी पलटणला समाधानकारक यश मिळाले नाही. प्रो-कबड्डीचा दुसरा हंगाम फेब्रुवारी २०१५ मध्ये लगेचच सुरू होणार आहे. या हंगामात पूर्ण ताकदीने उतरण्याचे पुणेरी पलटनने ठरविले आहे. यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर विभागवार त्यांनी कबड्डी स्पर्धांचे आयोजन करून त्यातून त्यांनी चांगले खेळाडू निवडण्याचे ठरविले आहे.कबड्डीत महाराष्ट्रात कोल्हापूर, सांगलीच्या खेळाडंूचे मोठे वर्चस्व आहे. पहिल्या हंगामात सांगलीचे काशिनाथ आडके व नितीन मदने, तर कोल्हापूरचा सागर खटाळे हे तीन खेळाडू खेळले. त्यांनी हा हंगाम चांगलाच गाजविला. आता या निमित्ताने आणखी काही खेळाडूंना नवीन व्यासपीठ मिळणार आहे.आयपीएलच्या धर्तीवर सुरू केलेल्या प्रो-कबड्डीमुळे ग्रामीण भागातील खेळाडूंना व मुलांना कबड्डीमुळे चांगले दिवस आले आहेत. अनेक खेळाडू यात सहभागी होऊ शकतात. शिरोली येथील नवभारत क्रीडा मंडळाच्या मैदानावर ४ डिसेंबरला दिवस-रात्र सत्रात ही स्पर्धा मॅटवर होणार आहे. या स्पर्धेतून खेळाडू निवडण्यासाठी पुणेरी पलटणचे संघ व्यवस्थापक, अधिकारी तसेच कबड्डीतील अर्जुन पुरस्कार प्राप्त पंकज शिरसाट, शांताराम जाधव, आदी उपस्थित राहणार आहेत.पश्चिम महाराष्ट्रातील नामवंत १४ संघ यात सहभागी होणार असल्याने शिरोली व जिल्ह्याला खूप दिवसांनंतर चांगल्या खेळाडूंचा खेळ पाहावयास मिळणार आहे. नवभारत मंडळानेही या स्पर्धा मॅटवर घेतल्या असून, त्याचे नेटके नियोजन लावले आहे.