शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

कायमस्वरूपी साथरोग नियंत्रण रूग्णालय उभे करण्यासाठी पुढाकार घ्या; उध्दव ठाकरेंचे आवाहन             

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2020 16:49 IST

सक्षम ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत १२ रूग्णालयातील अत्याधुनिक आरोग्य सुविधांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

कोल्हापूर : कोणत्याही साथीला सामोरे जाण्यासाठी रूग्णालयांची आवश्यकता आहे. यासाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभी करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.  कोल्हापूर जिल्ह्यात कायमस्वरूपी साथरोग नियंत्रण रूग्णालय उभे करण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा. त्यासाठी आवश्यक ती सर्व मदत दिली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज दिली.

सक्षम ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत जिल्ह्यातील  १० ग्रामीण रूग्णालय व दोन उपजिल्हा रूग्णालयांमध्ये करण्यात आलेल्या अत्याधुनिक आरोग्य सुविधांचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून आज झाला.

मुख्यमंत्री  ठाकरे यावेळी म्हणाले, खासदार, आमदार अनेकजण होतात. प्रत्येकाला वारसा, परंपरा असते. दिवंगत सदाशिवराव मंडलिक यांची परंपरा खासदार संजय मंडलिक पुढे चालवित आहेत. या रुग्णालयांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचे मिळणारे आशीर्वाद फार मोलाचे आहेत. दररोज केवळ आरोग्यावरच आपले काम सुरु आहे. विकासाचे मार्गक्रमण करत आहोत. जिल्ह्यासाठी सदृढ आरोग्य सुविधा देणे आवश्यक आहे. त्यासाठी मुंबईसारख्या सेवा ग्रामीण भागात करायच्या आहेत.

आजही आपण फिल्ड, जंबो रुग्णालयांची उभारणी राज्यभर केली आहे. या सुविधा तात्पुरत्या असल्या तरी त्यातून आपण दर्जेदार आरोग्य सेवा देत आहोत. ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, आयसीयु कक्षात आवश्यक असणाऱ्या सुविधा उपलब्ध आहेत. याचा उपयोग कायम स्वरुपी यंत्रणा उभी करताना करता येईल. जिल्हाधिकाऱ्यांनी आवश्यक असलेला प्रस्ताव पाठवावा, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

दुर्गम भागात सेकंड ओपिनिएन हवे असेल, तज्ज्ञांचा सल्ला हवा असेल तर मुंबई पुण्याचाच नाही तर जगभरातील तज्‌ज्ञांची सेवा टेलीमेडिसिनच्या माध्यमातून उपलब्ध करुन देता येईल.   पुढील महिन्यात चेस द व्हायरसचा संपूर्ण कार्यक्रम महाराष्ट्रभर राबविण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. ५५ वर्षावरील सर्व नागरिकांची यात तपासणी करण्यात येणार असून ज्यांना ह्दयरोग, किडनीचे किंवा इतर आजार आहेत त्यांच्यावर या अंतर्गत उपचार करण्यात येईल.

महाराष्ट्र हा लढवय्या आहेच. मनाने आणि विचारांनी सदृढ आहे. या महाराष्ट्राला आपण सर्वजण मिळून आरोग्याच्या दृष्टिने सदृढ महाराष्ट्र घडवूया, स्वयंशिस्तीने एकमेकांची काळजी घेऊन, परस्पर सहकार्याने काम करुन कोरोनाला नक्की हरवू या असा विश्वासही मुख्यमंत्री  ठाकरे यांनी व्यक्त केला. सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर यावेळी म्हणाले, दिवंगत खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी ग्रामीण भागातील वंचित घटकांना आधार देण्याचे काम केले आहे. तिच परंपरा खासदार प्रा. संजय मंडलिक यांनी पुढे जोपासली आहे.चंदगडमध्ये ट्रॉमा सेंटर मंजूर केले आहे. मात्र त्यासाठी लागणाऱ्या जागेचा प्रश्न अद्याप प्रलंबित आहे. तो मार्गी लावावा. एनएचएम मधून प्रस्ताव पाठविला असून त्यासाठी निधी मिळावा आणि फिजीशिएनना कायमस्वरुपी सेवेत घेणेबाबत मार्ग काढवा अशी मागणी त्यांनी केली.

आमदार प्रकाश आबिटकर यावेळी म्हणाले, दिवंगत खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या स्मृती दिनानिमित्त सदाशिवराव मंडलिक इरिगेशन डेव्हलपमेंट रिसर्च फौंडेशन मार्फत देण्यात येणारा स्मृती गौरव पुरस्कार रद्द करुन पुरस्काराची संपूर्ण रक्कम तसेच स्थानिक विकास निधी आणि मित्र परिवार व विविध औद्योगिक संस्थानी केलेली मदत अशा निधीतून ग्रामीण भागातील रुग्णालयांना सुविधा देत सक्षम केले आहे. याचा लाभ सर्वसामान्य जनतेला होणार आहे.

आमदार राजेश पाटील म्हणाले, दुर्गम, डोंगराळ भागात असणाऱ्या चंदगड, आजरा, गडहिंग्लज या तिन्हीसाठी गडहिंग्लज येथील उप जिल्हा रुग्णालयाची क्षमता वाढवावी. ट्रामा केअर सेंटरच्या जागेचा प्रश्नही मार्गी लावावा. माजी आमदार चंद्रदीप नरके यांनीही मनोगत व्यक्त केले.

जिल्हाधिकारी दौलत देसाई यावेळी म्हणाले, जिल्ह्यातील कागल, मुरगुड, राधानगरी, गारगोटी, सोळांकूर, आजरा, चंदगड, नेसरी, गगनबावडा व खुपिरे ही दहा ग्रामीण रुग्णालये आणि गडहिंग्लज व वळीवडे या दोन उप जिल्हा रुग्णालयांचा कायापालट करण्याचे काम फौंडेशनने केले आहे. याचा लाभ या भागातील सर्वसामान्य रुग्णांसाठी होणार आहे.

लॉकडाऊन शिथील केल्यानंतर मोठ्या प्रमाणात बाहेरच्या जिल्ह्यातून नागरिक आले. त्यामुळे जिल्ह्यामध्ये रुग्णांची संख्या वाढली.  जिल्ह्यात ४५ कोव्हिड काळजी केंद्र आणि २ समर्पित कोव्हिड आरोग्य केंद्रे उभारण्यात आली असून या ठिकाणी ऑक्सिजनची सुविधा देण्यात आली आहे. खासगी रुग्णालयांमध्ये खाटांची संख्या वाढविण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून २० कोटीचा निधी खर्च केला आहे. यात प्रामुख्याने  सर्वात आधी लॅब उभी करण्यात आली आहे, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.

 प्रारंभी सक्षम ग्रामीण आरोग्य अभियानांर्गत 12 रूग्णालयातील अत्याधुनिक आरोग्य सुविधांबाबतची चित्रफित दाखविण्यात आली.यावेळी महापालिका आयुक्त डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अधीष्ठाता डॉ. चंद्रकांत मस्के, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. सी. केम्पीपाटील, प्रांताधिकारी विजया पांगारकर, रामहरी भोसले उपस्थित होते. आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार यांनी आभार मानले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसkolhapurकोल्हापूर