मणिकर्निका घाट उद्ध्वस्त करणाऱ्यांवर कारवाई करा, मल्हार सेनेची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 15:44 IST2026-01-24T15:44:37+5:302026-01-24T15:44:37+5:30
'इतिहास पुसण्याचा प्रयत्न प्रशासन करत आहे'

मणिकर्निका घाट उद्ध्वस्त करणाऱ्यांवर कारवाई करा, मल्हार सेनेची मागणी
कोल्हापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी क्षेत्र काशी, वाराणशी येथे निर्माण केलेला मणिकर्निका घाट उद्ध्वस्त करणाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी मल्हार सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे करण्यात आली.
अहिल्यादेवींनी देशभरात हजारो मंदिरांचा जीर्णोध्दार स्वत: केला. बारा जोतिर्लिंगांचा जीर्णोध्दार करून तिथे घाट बांधले, धर्मशाळा बांधल्या, अन्नक्षेत्रे उभी केली. हा ऐतिहासिक ठेवा जतन करण्याऐवजी बुलडोझर लावून उद्ध्वस्त केला जात आहे. या घटनेचा निषेध करताना इतिहास पुसण्याचा प्रयत्न प्रशासन करत आहे. उत्तर प्रदेश सरकारने हा घाट पूर्ववत बांधाच, परंतु अहिल्यादेवींची, गंगा मातेची प्रतिम असलेली मणी पूर्ववत उभारावी, अशी मागणी मल्हार सेनेचे सरसेनापती बबनराव रानगे यांनी केली.
यावेळी, मेघना गावडे, बाबुराव बोडके, रुपेश आडूळकर, सागर बोंडेकर, कोंडिबा आडूळकर, रेजाश बाणदार, संकेत वाडकर आदी उपस्थित होते.