शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

लेखाधिकाऱ्यावर कारवाई करणार

By admin | Updated: November 12, 2014 23:59 IST

मुख्याधिकाऱ्यांची ग्वाही : अकौंटंटच्या सर्वच कर्मचाऱ्यांची बदलीची मागणी

इचलकरंजी : नगरपालिकेकडील मक्तेदारांना बिलांच्या रकमा अदा करण्यासंदर्भात लेखाधिकारी महादेव गोरडे अपमानास्पद वागणूक देतात. त्यांची बदली अन्यत्र करावी, या मागणीचा पुनरुच्चार मक्तेदारांनी नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे व मुख्याधिकारी सुनील पवार यांच्याकडे केला. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या सत्तारूढ व विरोधी अशा दोन्ही बाजूंच्या नगरसेवकांनी या मागणीला पाठिंबा दिला. त्यामुळे गोरडे यांच्या बदलीबाबतचा निर्णय उद्या, गुरुवारी दिला जाईल, असे आश्वासन मुख्याधिकाऱ्यांनी दिले.दरम्यान, स्वाभिमानी कामगार संघटनेच्यावतीने कामगार नेते व नगरसेवक संभाजीराव काटकर यांच्या नेतृत्वाखाली अतिरिक्त मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार यांना एक शिष्टमंडळ भेटले. लेखाधिकारी गोरडे हे गेली तीन वर्षे कामकाज पाहत आहेत. गोरडे यांच्यावर केलेले आरोप खोटे व बिनबुडाचे आहेत. मात्र, अचानकपणे मक्तेदारांनी त्यांची बदली मागणे योग्य नाही. कोणताही आकस न ठेवता गोरडे यांच्यावर कारवाई करू नये, अशी मागणी या शिष्टमंडळाने केली. तसेच अकौंटंट विभागाकडे कार्यान्वित असलेल्या सुमारे २१ कर्मचाऱ्यांनी मक्तेदार अकौंटंट विभागाची बदनामी करीत आहेत. दबावतंत्रावरून लेखाधिकाऱ्यांवर कारवाई झाल्यास अकौंटंट विभागातील सर्वच कर्मचाऱ्यांची बदली करावी, अशी मागणी या विभागातील कर्मचाऱ्यांनी नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे व अतिरिक्त मुख्याधिकारी पोतदार यांच्याकडे केली. त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळेच वळण मिळाले आहे.लेखाधिकारी गोरडे हे मक्तेदारांची बिले अदा करताना किंवा बयाणा रक्कम परत करतेवेळी उद्धटपणे बोलतात. अपमानास्पद वागणूक मिळत असल्याबद्दल पालिकेकडील सुमारे ३५ मक्तेदारांनी ५ नोव्हेंबरला नगराध्यक्षा व मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देऊन त्यांच्या बदलीची मागणी केली होती. अन्यथा काम बंद करण्याचा इशारा दिला होता. (प्रतिनिधी)आज योग्य निर्णय घेणारमक्तेदारांनी दिलेली मुदत संपत असल्याने सर्व मक्तेदार नगराध्यक्षांच्या दालनात आले. त्यांनी लेखाधिकारी गोरडे यांच्या बदलीसंदर्भात कारवाई अद्याप झाली नसल्याबद्दल काम बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला. यावेळी बोलताना मुख्याधिकारी पवार यांनी गोरडे यांना नोटीस दिली आहे. नोटिसीला उत्तर देण्यासाठी तीन दिवसांची मुदत दिली असून, ही मुदत बुधवारी संपत आहे. उद्या, गुरुवारी त्यांच्यावरील कारवाईचा योग्य निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले.