कोल्हापुरात शनिवार पेठेतील तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आई, भाऊ पोलिसांच्या ताब्यात

By उद्धव गोडसे | Updated: April 4, 2024 15:02 IST2024-04-04T15:01:55+5:302024-04-04T15:02:14+5:30

मारहाणीत तरुणीचा मृत्यू झाला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला

Suspicious death of girl from Shaniwar Peth in Kolhapur; Mother, brother in police custody | कोल्हापुरात शनिवार पेठेतील तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आई, भाऊ पोलिसांच्या ताब्यात

कोल्हापुरात शनिवार पेठेतील तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आई, भाऊ पोलिसांच्या ताब्यात

कोल्हापूर : शनिवार पेठेतील शनिवार पोस्ट ऑफिसजवळ राहणारी वैष्णवी लक्ष्मीकांत पोवार (वय २४) हिचा सीपीआरमध्ये उपचारादरम्यान संशयास्पद मृत्यू झाला. गुरुवारी (दि. ४) सकाळी घडलेल्या घटनेने परिसरात खळबळ उडाली. तिच्या अंगावर मारहाण झाल्याच्या खुणा आहेत, त्यामुळे मारहाणीत तरुणीचा मृत्यू झाला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, खासगी बँकेत नोकरी करणारी वैष्णवी पोवार ही आई आणि भाऊ यांच्यासोबत शनिवार पेठेतील घरात राहत होती. गुरुवारी सकाळी तिला नातेवाईकांनी उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. तिच्या अंगावर मारहाणीच्या खुना दिसत असल्याचे सीपीआरमधील डॉक्टरांनी पोलिसांना सांगितले.

त्यानुसार पोलिसांनी मृतदेहाची पाहणी करून मृत वैष्णवी हिची आई शुभांगी लक्ष्मीकांत पोवार (वय ५०) आणि भाऊ या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. वैष्णवी हिला कोणी आणि कोणत्या कारणावरून मारहाण केली, ते अद्याप सष्ट झालेले नाही. लक्ष्मीपुरी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

Web Title: Suspicious death of girl from Shaniwar Peth in Kolhapur; Mother, brother in police custody