शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सर्व्हे ‘भाजप’ला अनुकूल; पण रिस्क घेणार नाही : चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 13:59 IST

सध्याचे सर्व्हे पाहता राज्यात भाजपला स्वबळावर लढण्यासाठी अनुकूल वातावरण आहे; परंतु दोन्ही काँग्रेस एकत्र लढताना आम्हाला रिस्क घ्यायची नाही. त्यामुळे शिवसेनेशी युती नक्की होणार आहे. याबाबत कुणीही मनात संशय बाळगू नये, असा स्पष्ट निर्वाळा ‘भाजप’चे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला.

ठळक मुद्देचंद्रकांत पाटील यांचे युतीबाबत भाष्यभविष्यकाळात २८८ जागा लढवायच्या आहेत : व्ही. सतीश

कोल्हापूर : सध्याचे सर्व्हे पाहता राज्यात भाजपला स्वबळावर लढण्यासाठी अनुकूल वातावरण आहे; परंतु दोन्ही काँग्रेस एकत्र लढताना आम्हाला रिस्क घ्यायची नाही. त्यामुळे शिवसेनेशी युती नक्की होणार आहे. याबाबत कुणीही मनात संशय बाळगू नये, असा स्पष्ट निर्वाळा ‘भाजप’चे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला.येथील रामकृष्ण लॉन येथे आयोजित शहर, तसेच जिल्'ातील शक्ती केंद्रप्रमुखांच्या मेळाव्यामध्ये ते बोलत होते. यावेळी राष्ट्रीय संघटन मंत्री व्ही. सतीश यांचे प्रमुख मार्गदर्शन झाले. या कार्यक्रमाआधी सदर बाजार येथे काही घरांमध्ये जाऊन प्रदेशाध्यक्ष पाटील आणि व्ही. सतीश यांनी ‘भाजप’ची सदस्य नोंदणी केली. तसेच वृक्षारोपणही केले.यावेळी पाटील म्हणाले, दोन्ही काँग्रेसची राजकीय अवस्था पाहता त्यांना आघाडी करण्याशिवाय पर्याय नाही; परंतु गेल्या साडेचार वर्षांत आपण विकासकामांचा डोंगर उभा केला आहे. न होणारे अनेक निर्णय घेतले. त्यामुळे आपल्यासाठी सर्व सर्व्हे अनुकूल आहेत; परंतु दोन्ही काँग्रेस एकत्र लढत असताना आम्ही रिस्क घ्यायला तयार नाही. म्हणूनच युतीबाबत संशय बाळगू नका. ९ आॅगस्ट क्रांतिदिनी सदस्य नोंदणी, १९ आॅगस्ट अटलबिहारी वाजपेयी प्रथम स्मृतिदिनी विविध कार्यक्रमांचे आयोजन, तसेच पदवीधर नोंदणी याबाबतही पाटील यांनी यावेळी माहिती दिली.संघटन मंत्री व्ही. सतीश म्हणाले, बुथप्रमुखांची महत्त्वाची कामगिरी आहे. बुथ मजबूत असेल, तर त्या आधारावरच पक्ष यश मिळवू शकतो. शिवसेना-भाजप युती होणार की नाही, उमेदवार कोण असणार? या चर्चेत आपण पडण्याचे कारण नाही. आपण संघटन मजबूत करण्यावर भर दिला पाहिजे. पुढे कधी ना कधी आपल्याला २८८ जागा लढवायच्या आहेत. यासाठी आत्तापासूनच काम करा. आपल्या बूथ मजबुतीचा आपल्यासोबतच्या उमेदवारांनाही फायदा झाला पाहिजे.

आमदार सुरेश हाळवणकर यांनी स्वागत केले. जिल्हा सरचिटणीस विजय जाधव यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी आमदार अमल महाडिक, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक, संपर्कमंत्री मकरंद देशपांडे, लोकलेखा समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. सचिन पटवर्धन, पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री रवी अनासपुरे, संघटन मंत्री बाबा देसाई, जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके, महानगर अध्यक्ष राहुल चिकोडे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्यासह विविध नगराध्यक्षा, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, तालुकाध्यक्ष, बूथप्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते.मुश्रीफ यांच्यावरील छाप्याबाबत बोलण्यास नकारयावेळी कोणत्याही प्रश्नोत्तरांसाठी प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी नकार दिला. एरवी उत्साहाने बोलणाऱ्या पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर पडलेल्या आयकरच्या छाप्याबाबत विचारणा केल्यानंतरही बोलण्यास नकार दिला. 

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपाkolhapurकोल्हापूर