शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
3
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
4
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
5
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
6
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
7
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
8
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
9
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
10
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
11
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
12
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
13
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
14
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
15
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
16
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
17
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
18
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
19
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
20
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
Daily Top 2Weekly Top 5

वनविभागाने ताब्यात घेतलेल्या कबुतरांवर देखरेख,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:54 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : वनविभागाने ताब्यात घेतलेल्या त्या चाळीस कबुतरांची पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी होत असून, संबंधितावर गुन्हा दाखल ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : वनविभागाने ताब्यात घेतलेल्या त्या चाळीस कबुतरांची पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी होत असून, संबंधितावर गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. करवीरचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुधीर सोनवले यांनी ही माहिती दिली.

वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ नुसार वन्यप्राणी तसेच वन्यपक्षी व वन्यजीव यांना विनापरवाना बाळगणे गुन्हा आहे. कबुतरे हे वनविभागाच्या संरक्षित शेड्यूल्ड वर्ग चारमध्ये समाविष्ट पक्षी आहेत. कोल्हापुरातील उत्तरेश्वर पेठ आणि गवत मंडई येथे समीर मोरे हे सुमारे चाळीस कबुतरे विनापरवाना बाळगत असल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती. त्यानुसार गुरुवारी वनविभागाच्या पथकाने या दोन्ही ठिकाणी छापे टाकले, तेव्हा तेथे मोरे यांच्याकडे ही कबुतरे आढळली. त्यामुळे वनविभागाने ही कबुतरे तत्काळ ताब्यात घेतली आणि वनविभागाच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिली.

या प्रकरणी समीर मोरे यांना ही कबुतरे बाळगणे गुन्हा असल्याची माहिती वनविभागाने त्यांना दिली असून, शुक्रवारी मोरे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तथापि, ही कबुतरे मोरे यांनी स्वत:हून वनविभागाच्या ताब्यात दिली असून, तपासकार्यात सहकार्य करत असल्यामुळे त्यांना ताब्यात घेतले नसल्याचे सोनवले यांनी सांगितले. मोरे हेही कबुतरे पाळून या कबुतरांच्या झुंजी लावत होते. वाईट उद्देशाने ते कबुतरे पाळत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

दरम्यान, या कबुतरांची प्रकृती चांगली असून, योग्य वेळी त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येईल, अशी माहिती सोनवले यांनी दिली आहे.

(संदीप आडनाईक)