शिक्षक कर्मचारी पतसंस्थेची रविवारी वार्षिक सभा;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:24 IST2021-09-03T04:24:29+5:302021-09-03T04:24:29+5:30

जयसिंगपूर : येथील माध्यमिक शिक्षक व शिक्षिकेतर कर्मचारी पतसंस्थेची रौप्यमहोत्सवी वार्षिक सभा रविवारी (दि. ५) ऑनलाईन स्वरुपात होणार आहे. ...

Sunday annual meeting of the Teachers Employees Credit Union; | शिक्षक कर्मचारी पतसंस्थेची रविवारी वार्षिक सभा;

शिक्षक कर्मचारी पतसंस्थेची रविवारी वार्षिक सभा;

जयसिंगपूर : येथील माध्यमिक शिक्षक व शिक्षिकेतर कर्मचारी पतसंस्थेची रौप्यमहोत्सवी वार्षिक सभा रविवारी (दि. ५) ऑनलाईन स्वरुपात होणार आहे. तरी सर्व सभासदांनी सभेस उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्षा सुनीता जोंग यांनी केले आहे.

रौप्यमहोत्सवी वर्षात संस्थेस ३४ लाख रुपये नफा झाला असून, सभासदांना १२ टक्के लाभांश देण्यात येत आहे. सभासद संख्या ३७७ इतकी असून, भागभांडवल ४ कोटी रुपये आहे. संस्थेकडे एकूण ठेवी १५ कोटी असून, कर्जे १४ कोटी वाटप केले आहे. संस्थेला तपासणी वर्ग ‘अ’ आहे. याप्रसंगी बी. बी. पाटील, जी. एन. पाटील, आर. बी. कोळी, पी. ए. पाटील, जे. ए. कांबळे, एस. टी. कदम, पी. एस. खंजिरे, बी. एन. कुंभार, एस. एस. पटेल, ए. टी. चौगुले, डी. बी. पाटील, यु. आर. इंगळे, सुरेश हगरे उपस्थित होते.

Web Title: Sunday annual meeting of the Teachers Employees Credit Union;