शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजी विद्यापीठाच्या सर्व 'परीक्षा' होणार 'ऑफलाईन एमसीक्यू' पद्धतीने, विद्यार्थ्यांच्या लढ्याला यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2022 16:17 IST

विद्यार्थ्यांच्या लढ्याला यश

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाकडून उन्हाळी सत्रातील पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या सर्व ६५८ परीक्षा ऑफलाइन एमसीक्यू (वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नावली) स्वरूपात होणार आहेत. विद्या परिषद या अधिकार मंडळाने मान्यता दिल्यानंतर सोमवारी विद्यापीठाने त्याबाबतचा निर्णय घेतला. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून विद्यार्थ्यांच्या सुरू असलेल्या लढ्याला यश मिळाले आहे.विद्यापीठाने उन्हाळी सत्रातील सर्व परीक्षा ऑफलाइन एमसीक्यू स्वरूपात घेण्यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून विद्यार्थ्यांनी आंदोलनाच्या माध्यमातून लढा दिला. गेल्या आठवड्यापासून त्यांनी लढ्याची तीव्रता वाढविली. त्यावर विद्यापीठाने गुरुवारी सायंकाळी अभियांत्रिकी, विधि अभ्यासक्रमांची परीक्षा ऑफलाइन एमसीक्यू आणि उर्वरित सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षा पूर्वीप्रमाणे ऑफलाइन वर्णनात्मक घेण्याचा निर्णय जाहीर केला; पण विद्यार्थी संघटना सर्व परीक्षा ऑफलाइन एमसीक्यू स्वरूपात घेण्याच्या मागणीवर ठाम राहिल्या. त्यावर विद्यार्थ्यांची मागणी विद्यापीठ प्रशासनाने सोमवारी विद्या परिषदेसमोर ठेवली.या अधिकार मंडळाने उन्हाळी सत्रातील सर्व परीक्षा ऑफलाइन एमसीक्यू स्वरूपात घेण्यास मान्यता दिली. त्यानुसार परीक्षा होतील. नव्या पद्धतीनुसार परीक्षेची तयारी करण्यास विद्यापीठाला काही कालावधी लागणार आहे. त्याचा विचार करून सुधारित वेळापत्रक परीक्षा व मूल्यमापन मंडळाकडून लवकरच जाहीर केले जाणार आहे. महाविद्यालय स्तरावर सुरू असलेल्या पदवी प्रथम वर्ष पारंपरिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा महाविद्यालयाच्या नियोजनानुसार सुरू राहणार आहेत.

परीक्षेचे स्वरूप असेसर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीने (प्रत्यक्ष परीक्षा केंद्रावर हजर राहून) ५० गुणांची संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित (प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण २५ प्रश्न प्रत्येकी २ गुण) परीक्षा एक तास कालावधीची एमसीक्यू पद्धतीने होणार आहे. त्यासाठी प्रश्नसंचिक, जादा वेळ, दोन पेपरमधील अंतर आदींची मुभा असणार नाही.आकडेवारी दृष्टिक्षेपातउन्हाळी सत्रात होणाऱ्या परीक्षा : ६५८परीक्षार्थींची संख्या : २ लाख

अशी होती विद्यार्थ्यांची मागणीविद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये यासाठी परीक्षा पद्धतीमध्ये एकसमानता असावी. त्यामुळे अभियांत्रिकी, विधि अभ्यासक्रमांप्रमाणे सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षा ऑफलाइन एमसीक्यू पद्धतीने घेणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने विद्यापीठाने निर्णय घ्यावा, अशी मागणी सर्व विद्यार्थी संघटना कृती समितीने केली होती.

विद्या परिषद या अधिकार मंडळाने दिलेल्या निर्णयानुसार यावर्षी उन्हाळी सत्रातील सर्व परीक्षा ऑफलाइन एमसीक्यू स्वरूपात घेण्यात येणार आहे. त्याचे सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल. -डॉ. डी. टी. शिर्के, कुलगुरू

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShivaji Universityशिवाजी विद्यापीठexamपरीक्षाStudentविद्यार्थी