कोडोली :
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}कोडोली (ता. पन्हाळा) येथील दोन एकरांतील ऊस जळाल्याने लाखांचे नुकसान झाले. ही घटना शुक्रवारी घडली. आगीचे कारण समजू शकले नाही.
येथील गट नं. १७२२ मध्ये सेंद्रिय गूळ उत्पादनासाठी ऊस पिकविणेत आलेल्या दोन एकरांतील ऊस जळाल्याने सुमारे चार लाखांचे नुकसान झाले. प्रकाश गणपती भोसले यांचा एक एकर, पंडित पांडुरंग कापरे व गोरख कापरे या दोघांचा एक एकरातील ऊस जळून खाक झाला. घटनास्थळी तलाठी अनिल पोवार, कोतवाल सिराज आंबी यांनी भेट देऊन पंचनामा केला.