शहरं
Join us  
Trending Stories
1
अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... 
2
'प्रोजेक्ट फ्रीडम' बंद, होर्मुझमधील जहाजांना यापुढे सुरक्षा देणार नाही; ट्रम्प यांची मोठी घोषणा
3
डॉ. संग्राम पाटील यांचा यूकेमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा; हायकोर्टाने दिला दिलासा, काय म्हटलं?
4
ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार?
5
Palghar Crime: अघोरी पूजेसाठी बोलावले अन् १३ वर्षाच्या मुलीवर भोंदूबाबाने केला बलात्कार, पालघर हादरले
6
Samudrik Shastra: गालावरची खळी: केवळ सौंदर्य की भाग्याचं लक्षण? सामुद्रिक शास्त्र काय सांगते?
7
आसाम, बंगालमधील विजयानंतर भाजपा ‘या’ राज्यात ऑपरेशन लोटसच्या तयारीत? बड्या नेत्याने दिले संकेत
8
Multibagger Stock : १ लाखाचे बनले ३ कोटी रुपये; या शेअरनं दिला ३१०००% पेक्षा अधिक रिटर्न, एकेकाळी ₹१० पेक्षा कमी होती किंमत
9
पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ
10
ममतांचा किल्ला कसा भेदला? काय होता विजयाचा फॉर्म्युला? भाजपचे चाणक्य अमित शाह यांच्या प्लॅनची ‘इनसाइड स्टोरी’
11
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
12
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
13
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या ७ भारतीय खलाशांची केली मदत
14
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
15
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
16
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
17
निश्चय केलेल्या 'विजय'चा विजय! प्रस्थापित गडांना खिंडार पाडणारा 'थलपती'चा झंझावात
18
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
19
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
20
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
Daily Top 2Weekly Top 5

करवीर तालुक्यातील ऊस पाण्याअभावी वाळू लागला !

By admin | Updated: May 7, 2015 00:19 IST

अपुरा पाणीपुरवठा : खंडित वीजपुरवठ्यामुळे पाणीपुरवठा संस्थांचे नियोजन ढासळले

शिवराज लोंढे - सावरवाडी सहकारी तत्त्वावर चालणाऱ्या ग्रामीण भागातील पाणीपुरवठा संस्थेचे पाणी वाटप नियोजन कोसळले आहे. वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, उन्हाळ्यामुळे वाढीव वीज भारनियमन, नद्यांच्या पात्रात पाणी असूनही शेतीला योग्यवेळी पाणी मिळत नाही, पाण्याअभावी पिकांचे नुकसान, या साऱ्या पार्श्वभूमीवर करवीर तालुक्यात ऐन उन्हाळ्यात हजारो एकर क्षेत्रातील ऊस वाळू लागला आहे.करवीर तालुक्यात कुंभी, तुळशी, भोगावती, पंचगंगा या नद्या वाहतात. नदीची पात्रे पाण्याने तुडुंब भरलेली असतानाही सहकारी तत्त्वावर चालणाऱ्या पाणीपुरवठा योजनांद्वारे उन्हाळ्यात शेतीला अपुरा पाणीपुरवठा होत असतो. पाणी वाटपात गटा-तटाचे राजकारण सुरू झाले आहे. शेतीला उन्हाळ्यात २० ते २२ दिवसांनी पाणी मिळते. परिणामी, खोडवा, बोडवा, आडसाली ऊस पिकांची क्षेत्रे पाण्याअभावी वाळू लागली आहेत.पिकांना पाणी देण्यात वशिलेबाजी सुरू झाल्याने ऊस पिके वाळू लागली तरी पाणीपुरवठा संस्थांचे पदाधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहेत. शासनाचा पाणीपुरवठा संस्थांवर वचक नसल्यामुळे उन्हाळ्यात पाणी वाटपाचे नियोजन ढासळले आहे. उन्हाळ्यात वारंवार वीजपुरवठा खंडित होणे, वाढीव वीज भारनियमनाचा फटकाही शेती व्यवसायाला बसू लागला आहे. भात पिकातील ऊस लावणी, आडसाली ऊस लावणी, खोडवा, बोडवा या पिकांना यंदा वेळेवर पाणी मिळत नसल्यामुळे ऊसपिकाच्या वाढीवर गंभीर परिणाम जाणवू लागला आहे. उन्हाळ्यात ऊसपिके करपू लागल्याने ऊसटंचाई भासणार आहे.एकीकडे पाणीपुरवठा संस्थेच्या पाणीपट्टीमध्ये भरमसाट वाढ, तर दुसरीकडे शेतीला वेळेवर पाणीपुरवठा केला जात नाही. त्यामुळे ऊसवाढीवर गंभीर परिणाम होतात. शेतीला भरपूर पाणी देणे हे पाणीपुरवठा संस्थांचे कर्तव्य आहे. पाणी वाटपात होणाऱ्या गैरव्यवहारांबाबत आवाज उठविण्यात येईल. - दादा देसाई, उपाध्यक्ष, भाजप करवीर तालुका.पाणीपुरवठा संस्थेवर शासनाने अंकुश ठेवणे गरजेचे आहे. कारभाराची चौकशी होणे काळाची गरज आहे. शेती वीजभार नियमनमुक्त करण्यासाठी शासनाने निर्णय घ्यावा.- नामदेव गोदडे, स्वाभिमानी शेतकरी संघटना.पाणीपट्टी दरात विसंगतीसहकारी साखर कारखान्यांच्या ऊस बिलातून पाणीपुरवठा संस्था पाणीपट्टी वसुली करून घेतात. साखर कारखान्यांना जादा भरणा कळवून शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून जादा आगावू रक्कम कपात केली जाते. त्याचा हिशेबही शेतकऱ्यांना दिला जात नाही. पाणीपट्टी दरात यामुळे विसंगती आढळत आहे.