शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
2
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
3
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
4
Top Marathi News Live: आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल
5
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
6
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
7
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
8
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
9
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
10
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
11
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
12
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
13
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
14
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
15
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
16
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
17
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
18
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
19
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
20
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
Daily Top 2Weekly Top 5

दुग्गूनवाडीच्या ""मंगेश""ची अशीही देशभक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:54 IST

दुग्गूनवाडीच्या ''''मंगेश''''ची अशीही देशभक्ती दुग्गूनवाडीच्या ''''मंगेश''''ची अशीही देशभक्ती * जवानांसाठी मोफत प्रवासाची सोय : सैनिकांतूनही उपक्रमाचे स्वागत शिवानंद पाटील ...

दुग्गूनवाडीच्या ''''मंगेश''''ची अशीही देशभक्ती

दुग्गूनवाडीच्या ''''मंगेश''''ची अशीही देशभक्ती

* जवानांसाठी मोफत प्रवासाची सोय : सैनिकांतूनही उपक्रमाचे स्वागत

शिवानंद पाटील । गडहिंग्लज

स्वत: सैनिक नाही अन् नातेवाइकांमध्येही कोणी सैनिक नाही. मात्र, सीमेवर निधड्या छातीने शत्रूशी दोन हात करणाऱ्या व अहोरात्र डोळ्यात तेल घालून देशसेवा बजावणाऱ्या सैनिकांच्या आदरापोटी दुग्गूनवाडीच्या मंगेश सुतार यांनी खास सैनिकांसाठी सुरू केलेल्या उपक्रमाचे सैनिक व देशप्रेमीतून कौतुक होत आहे.

दुग्गूनवाडी (ता. गडहिंग्लज) येथील मंगेश जाधव यांनी जवानांना अभिमानाने घरापासून ते रेल्वे स्टेशन, विमानतळ किंवा बसस्थानकापर्यंत स्पेशल गाडीने सोडण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. स्वत: सुतार व त्यांचे मित्र अनुपम चिकरे हे सैनिकांना इच्छित ठिकाणापर्यंत सोडण्याचे काम करत आहेत. त्याबदल्यात ते कोणताही मोबदला घेत नाहीत. केवळ संबंधित सैनिकांनी बळजबरीने काही दिले तरच ते स्वीकारतात.

एखादा जवान शहीद झाल्यानंतर त्याचे पार्थिव घरी येऊन अंत्यविधी होईपर्यंत गावकऱ्यांसह सीमाभागातील अनेकजण शहीद जवानांच्या कुटुंबीयांना धीर देतात. मात्र, एखादा जवान सुट्टीवर गावी येताना किंवा पुन्हा सुट्टी संपवून देशसेवेसाठी जाताना त्यांना धीर देण्यासाठी कुटुंबीय सोडून कोणीही नसतात.

-----------------------------------

प्रतिक्रिया

स्वत:ची व कुटुंबीयांची काळजी न करता देशासाठी प्राण पणाला लावणाऱ्या सैनिकांच्या ऋणातून उतराई होण्यासाठीच हा उपक्रम सुरू केला आहे. सुट्टी संपवून पुन्हा सीमेवर जाणाऱ्या अनेक जवानांना सोडण्यासाठी जात असताना त्यांच्या व्यथा ऐकून क्षणभर त्यांच्याबद्दल अभिमानही वाटतो अन् मनही भरून येते.

- मंगेश सुतार, दुग्गूनवाडी, ता. गडहिंग्लज.

-----------------------------------

* ८ दिवसांत ११ जणांना सेवा

मुंबई येथील २६/११ च्या हल्ल्यातील शहिदांना आदरांजली वाहून मंगेश यांनी या सेवेचा प्रारंभ केला. त्यांनी ८ दिवसांत गडहिंग्लज, शिप्पूर, बुगड्डीकट्टी, हसूरसासगिरी, निपाणी, नेसरी, लिंगनूर येथील ११ जवानांना बेळगाव व कोल्हापूरच्या विमानतळ व रेल्वेस्थानकापर्यंत सेवा दिली आहे.

-----------------------------------

फोटो ओळी : लिंगनूर काानूल (ता. गडहिंग्लज) येथे सुट्टी संपवून देशसेवेसाठी जाणारे जवान विशाल घुगरे यांना महेश सुतार यांनी आपल्या खास वाहनातून बेळगाव रेल्वेस्थानकापर्यंत सोडले. प्रारंभी सेवानिवृत्त सुभेदार रावसाहेब पाटील यांनी सुतार यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. याप्रसंगी जवान बसवराज पाटील, राहुल पाटील, दीपक देवार्डे व उत्तम जोशीलकर, आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

क्रमांक : ०३१२२०२०-गड-०२