राष्ट्रीय मैदानी स्पर्धेत शिंदे, माने आदींचे यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:16 IST2021-07-22T04:16:06+5:302021-07-22T04:16:06+5:30

कोल्हापूर : गोवा येथे झालेल्या मास्टर्स ॲथलेटिक्स स्पर्धेत कोल्हापरचे मास्टर्स ॲथलिट आकाराम शिंदे (चालणे), बंडू माने यांच्यासह पाच जणांनी ...

Success of Shinde, Mane etc. in National Field Competition | राष्ट्रीय मैदानी स्पर्धेत शिंदे, माने आदींचे यश

राष्ट्रीय मैदानी स्पर्धेत शिंदे, माने आदींचे यश

कोल्हापूर : गोवा येथे झालेल्या मास्टर्स ॲथलेटिक्स स्पर्धेत कोल्हापरचे मास्टर्स ॲथलिट आकाराम शिंदे (चालणे), बंडू माने यांच्यासह पाच जणांनी यश मिळवले.

मडगाव (गोवा) येथील वन नेशनु वन फ्लॅग वन सोल स्पोर्ट्सतर्फे आयोजित केलेल्या या स्पर्धेत शिंदे यांनी ८० वयोगटावरील गटात ३ कि.मी. धावणे सुवर्णपदक पटकाविले. तर बंडू माने यांनी ८०० मीटर धावणे (सुवर्ण), सत्तर वर्षांवरील गटात तुकाराम अनुगडे यांनी १० हजार मीटर धावणे (सुवर्ण), ५० वयोगटावरील १० हजार मीटर धावणे स्पर्धेत संभाजी काळेल (सुवर्ण), वर्षा जाेशी व वंदना पाटील राष्ट्रीय बास्केटबाॅल स्पर्धेत सांघिक सुवर्णपदक मिळवले. या सर्व खेळाडूंची या कामगिरीवर नेपाळ येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

फोटो : २१०७२०२१-कोल-गोवा टूर्नामेंट

ओळी : गोवा येथे झालेल्या मास्टर्स ॲथलेटिक्स स्पर्धेत यश मिळवलेले कोल्हापूरचे खेळाडू.

Web Title: Success of Shinde, Mane etc. in National Field Competition