शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
3
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
4
'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
5
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
6
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
7
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
8
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
9
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
10
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
11
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
12
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
13
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
14
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
15
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
16
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
17
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
18
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
19
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
20
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

सहकार प्राधिकरणाचे यश : कोल्हापूर शहर, करवीर, हातकणंगले, शिरोळमधील नऊ संस्थांच्या होणार निवडणुका

By admin | Updated: December 10, 2014 00:17 IST

जिल्ह्यातील ‘ड’ वर्गातील ३२६ संस्था झाल्या बिनविरोध

राजाराम लोंढे-कोल्हापूर  जिल्ह्यातील ‘ड’ वर्गातील ३२६ सहकारी संस्थांच्या निवडणुका बिनविरोध करण्यात प्राधिकरणाला यश आले आहे. कोल्हापूर शहर, करवीर, हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील नऊ संस्थांच्या निवडणुका लागल्या आहेत. ‘ड’ वर्गातील आठ संस्थांनी ‘क’ वर्गानुसार निवडणूक प्रक्रियेची मागणी केल्याने त्यांची प्रक्रिया सुरू केली आहे. सहकार प्राधिकरणाने नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून ‘ड’ वर्गातील संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू केली होती. जिल्ह्णात आॅक्टोबर २०१४ अखेर ३८९ संस्था निवडणुकीस पात्र होत्या. त्यापैकी ३७२ संस्थांचे प्रस्ताव आयोगाकडे मंजुरीसाठी पाठविले होते, त्यानुसार या संस्थांच्या निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आले होते. ‘ड’ वर्गातील संस्थांच्या निवडणुका सभासदांच्या सर्वसाधारण सभेत हात वर करून बिनविरोध करण्याचे आदेश प्राधिकरणाने दिले होते. नोव्हेंबरअखेर या संस्थांची निवडणूक प्रक्रिया पुर्ण करण्यास प्राधिकरणाची डेडलाईन होती. त्यानुसार तालुका निबंधकांनी गेले महिनाभर निवडणूक प्रक्रिया राबविली होती. त्यामध्ये ३२६ संस्थांच्या निवडणुका बिनविरोध करण्यात निबंधकांना यश आले आहे. नऊ संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. या वर्गातील आठ संस्थांनी गुप्त पद्धतीने मतदान घेण्याची मागणी केली तर काहींची सभासद संख्या दोनशेपेक्षा अधिक असल्याने ‘क’वर्गात समावेश करण्याची मागणी प्राधिकरणाकडे केल्याने त्यांचा समावेश ‘क’ मध्ये केला आहे. कोल्हापूर शहर, हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील संस्थांचा समावेश आहे. ‘क’ वर्गातील १९१ संस्थांची प्रक्रिया सुरू मार्च २०१३ अखेर मुदत संपलेल्या ‘क’ वर्गातील १९१ संस्थांच्या निवडणूक कार्यक्रम मंजुरीसाठी सहकार प्राधिकरणाकडे पाठविण्यात आला आहे. त्याला मंजुरी मिळाली असून या संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यानंतर आॅक्टोबर २०१४ पर्यंत मुदत संपलेल्या संस्थांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे.संवेदनशील तालुक्यातील संस्था बिनविरोधराजकीयदृष्ट्या अतिसंवेदनशील असणाऱ्या कागल, राधानगरी, भुदरगड तालुक्यातील ‘ड’ वर्गातील सर्वच संस्था बिनविरोध झाल्या आहेत. करवीरमध्ये ६४ पैकी केवळ तीन संस्थांची निवडणुका होत आहेत. ‘ड’ वर्गातील संस्था निवडणूक कार्यक्रमतालुकापात्रबिनविरोधनिवडणूक ‘क’ वर्गातझालेल्या समावेश कोल्हापूर शहर४१३१३१हातकणंगले९०८३१६करवीर६४४९३-कागल१६१४-- शिरोळ४६४३२१शाहूवाडी६६--गडहिंग्लज१०१--गगनबावडा१५१५--राधानगरी५२३८--आजरा१४१४--भुदरगड१५१४१४-पन्हाळा१८८--चंदगड२२-- ‘ड’ वर्गातील बहुतांशी संस्थांची प्रक्रिया संपली आहे. आता ‘क’ वर्गातील संस्थांच्या निवडणुकीस सुरुवात झाली असून जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत या संस्थांच्या निवडणुका पूर्ण करण्याचा मानस आहे. - सुनील शिरापूरकरजिल्हा उपनिबंधक