शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
3
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
4
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
5
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
6
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
7
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
8
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
9
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
10
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
11
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
12
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
13
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
14
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
15
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
16
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
17
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
18
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
19
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
20
पंतप्रधान, मंत्री, नेते अधिकारी, सर्वांच्याच मालमत्तेची होणार चौकशी, नेपाळमध्ये बालेन शाहांचा मास्टरस्ट्रोक
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ उपनिरीक्षकाची चौकशी?

By admin | Updated: July 9, 2015 00:33 IST

गोळीबार प्रकरण : चोरट्या दारूचा पर्दाफाश करणार

राजापूर : उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी हवेत गोळीबार करून पकडलेली गोवा बनावटीची दारू राजापूर तालुक्यातील वाल्ये येथे नेली जाणार असल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. दरम्यान, या दारू वाहतूक प्रकरणामध्ये असणाऱ्या साखळीचा लवकरच पर्दाफाश केला जाईल व आणखी काहीजणांना अटक केली जाईल, अशी माहिती राजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास गावडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. या कारवाईत हवेत गोळीबार करणाऱ्या उत्पादन शुल्क विभागाचे उपनिरीक्षक प्रमोद कांबळे यांची स्वतंत्रपणे चौकशी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.गेली अनेक वर्षे गोवा मार्गे कोकणसह लगतच्या कोल्हापूर जिल्ह्यात गोव्यातून चोरट्यामार्गे दारूचा मोठ्या प्रमाणावर पुरवठा केला जात असून, राज्य उत्पादन शुल्क विभागाने गेल्या काही महिन्यांत ठिकठिकाणी धाडी टाकून गोवा बनावटीचे मद्य पकडले होते. या सर्व प्रकारांमध्ये साखळी असून, त्याचा तपास वेगाने सुरू आहे. लवकरच या प्रकरणातील अन्य आरोपीही जाळ््यात सापडतील, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. पळून जाणाऱ्या गाडीमध्ये गोवा बनावटीच्या दारूसह केवळ दोनच आरोपी व तेही नि:शस्त्र असताना उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांवर हवेत गोळीबार करण्याची वेळ का आली, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आजपर्यंत राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठ्या प्रमाणात धाडी टाकत कोट्यवधी रुपयांची गोवा बनावटीची दारू जप्त केली आहे. मात्र, गोळीबार करण्याची वेळ कधीही आली नव्हती. या कारवाईत ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींना सन २०१२ मध्येही चोरटी दारू वाहतूक करताना पकडण्यात आले होते, अशी माहितीही समोर आली आहे.दोन दिवस पोलीसकोठडीसोमवारच्या कारवाईत अटक करण्यात आलेल्या प्रदीप विश्वनाथ निग्रे व दत्ताराम रामचंद्र राऊत यांना राजापूर पोलिसांनी जिल्हा सत्र न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्या दोघांनाही १० जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.