कोल्हापूर महानगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांची इस्रोकडे भरारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 17:35 IST2025-02-11T17:33:50+5:302025-02-11T17:35:03+5:30
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळांमधील ५६ विद्यार्थी सोमवारी बंगळुरू येथील इस्रोला भेट देण्यासाठी कोल्हापूर विमानतळावरून बंगळुरू येथे रवाना ...

कोल्हापूर महानगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांची इस्रोकडे भरारी
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळांमधील ५६ विद्यार्थी सोमवारी बंगळुरू येथील इस्रोला भेट देण्यासाठी कोल्हापूर विमानतळावरून बंगळुरू येथे रवाना झाले. मागील वर्षी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये ५६ विद्यार्थ्यांनी राज्य व जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये स्थान पटकाविले आहे. यापैकी राज्य व जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान पटकावलेल्या २१ विद्यार्थ्यांची बंगळुरू येथील इस्रोची भेट घडवून आणली जात आहे. हे सर्व विद्यार्थी सोमवारी रवाना झाले.
या विद्यार्थ्यांना केएमटीच्या वातानुकूलित सजविलेल्या बसमधून विमानतळापर्यंत सोडण्यात आले. यावेळी या विद्यार्थ्यांना शुभेच्छा व रवाना करण्यासाठी आमदार अमल महाडिक, शिक्षक आमदार जयंत आसगावकर, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त साधना पाटील, पुष्कराज क्षीरसागर, सहा. आयुक्त उज्ज्वला शिंदे, मुख्य लेखापरीक्षक कलावती मिसाळ उपस्थित होते. या विद्यार्थ्यांसोबत प्रशासनाधिकारी आर. व्ही. कांबळे, एक शिक्षक, एक शिक्षिका व एक महिला डॉक्टर रवाना झाले. हे विद्यार्थी एअरपोर्टवर गेल्यावर विमानतळ व्यवस्थापनाच्यावतीने सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करून केक कापण्यात आला.
आज, उद्या करणार पाहणी
बंगळुरू येथील इस्रोकडे आज मंगळवारी व उद्या बुधवारी भेट दिली जाणार आहे. याकरिता विद्यार्थ्यांना एक वेळ विमानाने प्रवास, परतीचा रेल्वेने प्रवास व संबंधित पर्यटन बसद्वारे केले जाणार आहे. या मोहिमेत इस्रोचे इस्ट्रक्ट तसेच मोक्स व पिन्या हा औद्योगिक परिसर पाहण्याची संधी मिळणार आहे. सर्व विद्यार्थांना व शिक्षकांना क्रिडाईतर्फे सूट व बूट उपलब्ध करून दिले आहेत.