शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
4
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
5
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
6
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या
7
‘अमेरिकेत जाण्यासाठी ३५ लाख रुपये खर्च केले, २५ तास बेड्या घालून परत धाडले’, तरुणाने मांडली व्यथा
8
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
9
धक्कादायक! २५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्या, सिनेमाचं रिलीज तोंडावर असताना संपवलं आयुष्य
10
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
11
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
12
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
13
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
14
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
15
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
16
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
17
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
18
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
19
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
20
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?

Kolhapur- चेष्टा जिवावर बेतली; विहिरीत ढकललेल्या विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 11:54 IST

युवकावर गुन्हा दाखल

गारगोटी : येथील विहिरीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्याला पाण्यात ढकलल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. तानाजी भागोजी बाजारी (वय १८, मूळ रा. धनगरवाडा - फये, सध्या रा. डॉ. आंबेडकर शासकीय वस्तिगृह, गारगोटी, ता. भुदरगड) असे मृत तरुणाचे नाव आहे.

चेष्टेने पाण्यात ढकलल्याप्रकरणी रोहित सुतार (रा. गारगोटी, ता. भुदरगड) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मृताचे चुलते सोनबा बिरू बाजारी यांनी गारगोटी पोलिसांत फिर्याद दिली आहे.पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, तानाजी बाजारी हा शिक्षणानिमित्त गारगोटी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृहात राहतो. बुधवारी रंगपंचमीनिमित्त सुट्टी असल्याने दुपारी अडीचच्या सुमारास डी.के. देसाई यांच्या शेतातील विहिरीवर कपडे धूत होता. त्यावेळी रंगपंचमी खेळून आंघोळीसाठी आलेल्या रोहित सुतार याने तानाजी बाजारी याला “काठावर बसून कपडे कसली धुतोस, विहिरीत उडी मार,” असे म्हणून चेष्टा-मस्करीत पाण्यात ढकलले. तानाजीला पोहता येत नसल्याने तो पाण्यात बुडाला.घटनास्थळी उपस्थित असलेल्यांनी त्यास तातडीने बाहेर काढण्यासाठी मदतीचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत फार उशीर झाला होता. मृत युवक विहिरीत पडल्याचे समजताच नातेवाइकांनी विहिरीजवळ गर्दी केली होती. अथक परिश्रमाने गारगोटी ग्रामपंचायतीचे कर्मचारी रणजित सोरटे यांनी मृतदेह बाहेर काढला. रात्री उशिरा गुन्हा दाखल झाल्यावर नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेतला.अभ्यासात होता हुशारतानाजी बाजारी हा अत्यंत हुशार विद्यार्थी होता. आर्थिक स्थिती बिकट असल्यामुळे त्याने बालपणापासून गारगोटी येथील मौनी विद्यापीठाच्या अमरनाथ कांबळे या वसतिगृहात राहून दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले. शाहू कुमार भवन प्रशालेतून त्याने दहावीला ९२ टक्के गुण मिळविले होते. येथील इन्स्टिट्यूट ऑफ सिव्हिल अँड रुरल इंजिनीअरिंग (आयसीआरई)मध्ये विद्युत अभियांत्रिकी विभागात द्वितीय वर्षात तो शिकत होता. गेल्याच महिन्यात झालेल्या पॉलिटेक्निकच्या तिसऱ्या सेमिस्टरमध्ये त्याने ९० टक्के गुण मिळविले होते. त्याच्या पश्चात आई, वडील आणि चार बहिणी असा परिवार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरdrowningपाण्यात बुडणेDeathमृत्यू