शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

गुणपत्रिकांसाठी विद्यार्थी आक्रमक

By admin | Updated: September 1, 2015 00:23 IST

परीक्षा भवनच्या फलकाची मोडतोड; विद्यापीठात कोल्हापूर, सांगली, सातारच्या विद्यार्थ्यांचा मोर्चा

कोल्हापूर : गुणपत्रिकेसाठी प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी आक्रमक होत शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा भवनवर सोमवारी मोर्चा काढला. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील संबंधित संतप्त विद्यार्थ्यांनी परीक्षा भवनच्या फलकाची मोडतोड केली. यावेळी आंदोलनकर्ते व सुरक्षा रक्षक यांच्यात धक्काबुक्की झाली.विद्यापीठाच्या कला, वाणिज्य व विज्ञान शाखेसह अन्य अभ्यासक्रमांच्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षातील अनेक विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल लागून देखील अद्याप गुणपत्रिका मिळालेल्या नाहीत. त्यामुळे त्यांचे पुढील वर्गातील प्रवेश रखडले आहेत. याबाबत चंदगडमधील चाळीसहून विद्यार्थी अ‍ॅड. संतोष मळवीकर यांच्या नेतृत्वाखालील सोमवारी सकाळी साडेदहा वाजता परीक्षा भवनवर मोर्चा काढण्यासाठी विद्यापीठात दाखल झाले. विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारावर त्यांनी परीक्षा विभाग, विद्यापीठ प्रशासनाच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली. त्यात विद्यापीठात परीक्षाविषयक कामकाजासाठी आलेले कोल्हापूर, सांगली, सातारा, फलटणमधील शंभराहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले. तेथून अकरा वाजण्याच्या सुमारास मोर्चाने ते परीक्षा भवन येथे पोहोचले. याठिकाणी ‘विद्यापीठाचा धिक्कार असो’, ‘भोंगळ कारभार करणाऱ्या परीक्षा विभागाचा धिक्कार’, ‘गुणपत्रिका लवकर मिळाल्याच पाहिजेत’, अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. आंदोलनकर्ते घोषणाबाजीनंतर भवनच्या परिसरात घुसले. शिवाय त्यांनी भवनच्या व्हरांड्यात असलेल्या फलकाची मोडतोड केली. यावेळी आंदोलनकर्ते व त्यांना रोखणाऱ्या सुरक्षा रक्षकांत धक्काबुक्की झाली. त्यामुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले. यााठिकाणी उपस्थित असलेले माजी बीसीयुडी संचालक डॉ. बी. एल. पाटील यांनी आंदोलनकर्त्यांना शांत केले. आंदोलनाची माहिती मिळताच प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे हे परीक्षा भवनमध्ये दाखल झाले. त्यांनी आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी परीक्षा नियंत्रकांच्या कक्षात बोलाविले. यावेळी अ‍ॅड. संतोष मळवीकर, प्रा. एन. एस. पाटील आणि डॉ. बी. एल. पाटील यांनी विद्यार्थ्यांना येत असलेल्या अडचणींबाबत डॉ. शिंदे, उपकुलसचिव जी. आर. पळसे यांच्याशी चर्चा केली. दीड तासांहून अधिक वेळ चाललेल्या चर्चेत डॉ. शिंदे यांनी शनिवारपर्यंत गुणपत्रिका दिल्या जातील, अशी ग्वाही दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन थांबविले. आंदोलनात कृष्णा रेगडे, भारत गावडे, जयवंत पेडणेकर, अनिल तळगुळकर, संदेश अवडण, शरद पाटील, तानाजी गावडे, नीलेश रेडेकर आदींसह दीडशेहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)...अन्यथा सोमवारी ‘टाळे ठोक’ आंदोलनगुणपत्रिका मिळत नसल्याची तक्रार घेऊन विद्यार्थी माझ्याकडे आले. त्यानंतर आम्ही २९ आॅगस्टपर्यंत गुणपत्रिका मिळाव्यात अन्यथा परीक्षा भवनवर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा देणारे निवेदन चंदगडच्या तहसीलदारांना दिले होते. या मुदतीपर्यंत गुणपत्रिका मिळाल्या नसल्याने आज आंदोलन केल्याचे अ‍ॅड. संतोष मळवीकर म्हणाले. ते म्हणाले, प्रभारी कुलसचिव डॉ. शिंदे यांनी येत्या शनिवारपर्यंत सर्व गुणपत्रिका दिल्या जातील, अशी ग्वाही दिली आहे. या मुदतीत गुणपत्रिका न मिळाल्यास विद्यापीठात सोमवारी (दि. ७) ‘टाळे ठोक’ आंदोलन केले जाईल.