शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

दोन रुपये जादा देण्यासाठीच हा संघर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:25 IST

चंदगड : चंदगड, आजरा आणि गडहिंग्लज या तीन तालुक्यांत म्हशीचे दूध ७० टक्के आहे. या दुधावरच ‘गोकुळ’चा ब्रँड निर्माण ...

चंदगड :

चंदगड, आजरा आणि गडहिंग्लज या तीन तालुक्यांत म्हशीचे दूध ७० टक्के आहे. या दुधावरच ‘गोकुळ’चा ब्रँड निर्माण झाला आहे. त्यामुळे मी सहा संचालक पद मागितली होती. त्यात मला यश मिळाले नाही. शेतकरी उत्पादकांना दोन रुपये जास्त मिळावे यासाठी ही लढाई आहे. पॅनल टू पॅनल मतदान करा, असे आवाहन आमदार राजेश पाटील यांनी केले.

यशवंतनगर (ता. चंदगड) येथे गोकुळ निवडणुकीसाठी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीच्या प्रचारार्थ आयोजित ठरावदारांच्या बैठकीत ते बोलत होते. चंदगड तालुका राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष संभाजीराव देसाई- शिरोलीकर यांनी स्वागत केले. शिवानंद हुंबरवाडी यांनी प्रास्ताविक केले.

पालकमंत्री सतेज पाटील यांनी शेतकरी उत्पादकांना दोन रुपये जादा मिळवून देण्यासाठी हा संघर्ष असून यावेळी ‘गोकुळ’मध्ये परिवर्तन निश्चित आहे.

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, गेली २०-२५ वर्षे सत्ताधाऱ्यांचा कारभार बघितलाय. आता आम्हाला ५ वर्षे सत्ता द्या, आम्ही दोन रुपये नक्की वाढवून देऊ. गेली २५ वर्षे ‘गोकुळ’साठी संघर्ष करत आलो आहे. सत्ताधाऱ्यांनी दुधाची बिले दिली म्हणजे उपकार केले नाहीत. खासदार संजय मंडलिक म्हणाले, सत्ताधाऱ्यांना विरोध करण्यासाठी एक चांगल पॅनल आम्ही उभे केले आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या सहकारामध्ये परिवर्तन करण्यासाठी ही निवडणूक आहे. शेतकऱ्यांच्या बाजूने असलेल्या मंडळींनी पाठिंबा दिल्याने विजय निश्चित झाला आहे. अरुण डोंगळे यांनी ‘गोकुळ’विषयी मनोगत व्यक्त केले.

यावेळी माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, सुस्मिता पाटील, विद्याधर गुरबे, नगराध्यक्षा प्राची काणेकर, विक्रम चव्हाण-पाटील, संग्रामसिंह नलवडे, एम. जे. पाटील, भरमाना गावडा, विशाल पाटील, जि. प. सदस्य कल्लाप्पा भोगण, अरुण सुतार, पं. स. दयानंद काणेकर, बाळासाहेब बांदिवडेकर, विलास पाटील, शिवाजी सावंत यांच्यासह ठरावदार उपस्थित होते. एम. के. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. भिकू गावडे यांनी आभार मानले.

------------------------

--

सर्वात चांगल्या दर्जाचे दूध असेल तर ते चंदगडचे. मात्र, तरीही चंदगडवरच अन्याय झाला आहे. दरम्यान, माघार घेतलेले सगळे गेले. मात्र आम्ही मात्र पाठीशी राहिलो. जिथे जाईल तिथे आमची गळचेपी झाली. आम्ही आता किती अन्याय सहन करायचा असा प्रश्न भाजपमधून कॉग्रेस मध्ये प्रवेश केलेले दौलतचे माजी अध्यक्ष गोपाळराव पाटील यांनी उपस्थित केला.

-

* फोटो ओळी : यशवंतनगर (ता. चंदगड) येथे गोकुळ निवडणुकीच्या प्रचारार्थ मेळाव्यात आमदार राजेश पाटील यांनी मार्गदर्शन केले.

क्रमांक : २६०४२०२१-गड-०८