शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
4
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
5
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
6
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
7
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
8
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
9
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
10
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
11
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
12
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
13
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
14
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
15
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
16
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
17
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
18
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
19
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
20
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
Daily Top 2Weekly Top 5

फायनान्स कंपन्यांनी मनमानी थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:24 IST

कोल्हापूर : लॉकडाऊनमुळे आर्थिक फटका सहन करत असलेल्या नागरिकांना केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार विविध बँकांनी कर्जदारांना हप्ते भरण्यासाठी ...

कोल्हापूर : लॉकडाऊनमुळे आर्थिक फटका सहन करत असलेल्या नागरिकांना केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार विविध बँकांनी कर्जदारांना हप्ते भरण्यासाठी सवलत देऊ केली आहे. पण, हे निर्देश डावलून जिल्ह्यातील फायनान्स कंपन्यांनी कर्जदारांकडून कर्जाच्या हप्त्याच्या वसुलीसाठी तगादा लावला आहे. या मनमानी कारभारावर प्रशासनाने आळा घालावा, अशी मागणी शिवसेनेने सोमवारी केली. शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी दौलत देसाई व जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांना याबाबतचे निवेदन दिले.

निवेदनात म्हटले आहे की, शासनाच्या निर्देशानुसार कर्जाचा हप्ता भरण्यास मुभा दिली असताना फायनान्स कंपन्यांकडून मात्र दबाव आणला जात आहे. वसुलीसाठी आलेल्या कर्मचाऱ्याकडे कंपनीचे ओळखपत्र नसणे, कर्जदारांना फोन करणे, घरी जाऊन धमकावण्याचे ही प्रकार घडत आहेत. नियमबाह्य आणि गुंडगिरीने होणारी ही वसुली अत्यंत गंभीर असून, फायनान्स कंपन्याच्या मनमानी कारभारात वाढ होत आहे. हप्ता न भरल्यास तब्बल २४ ते ४८ टक्के व्याज आकारण्याची धमकी देऊन बळजबरीने वसुली केली जात आहे. तरी संबंधितांवर कडक कारवाई करावी. यावेळी शिवसेनेचे उपशहरप्रमुख जयवंत हारुगले, सुनील जाधव, किशोर घाटगे, विभागप्रमुख राजू काझी, युवा सेना जिल्हा सरचिटणीस अविनाश कामते उपस्थित होते.

---

फोटो नं १२०४२०२१-कोल-शिवसेना निवेदन

ओळ : सक्तीने कर्जाची वसुली करणाऱ्या फायनान्स कंपन्यांवर कारवाई करा या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना निवेदन देण्यात आले.

--