Kolhapur: पोटदुखी अन् वारंवार ताप; पेंढारवाडीतील शाळकरी विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 16:51 IST2024-12-20T16:50:06+5:302024-12-20T16:51:00+5:30

उत्तूर : पेंढारवाडी (ता. आजरा ) येथील तेजस संजय आजगेकर (वय 15) या शाळकरी विद्यार्थ्यांचा अल्पशा आजाराने गडहिंग्लज येथे ...

Stomach ache and frequent fever; Unfortunate death of school students in Pendharwadi kolhapur district | Kolhapur: पोटदुखी अन् वारंवार ताप; पेंढारवाडीतील शाळकरी विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू 

Kolhapur: पोटदुखी अन् वारंवार ताप; पेंढारवाडीतील शाळकरी विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू 

उत्तूर : पेंढारवाडी (ता. आजरा ) येथील तेजस संजय आजगेकर (वय 15) या शाळकरी विद्यार्थ्यांचा अल्पशा आजाराने गडहिंग्लज येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला.  शाळेत कायम हसतमुख असणाऱ्या तेजसच्या निधनाची बातमी ऐकून शिक्षक, विद्यार्थी हळहळत होते.

मिळालेल्या माहितीनुसार, आठ-दहा दिवसांपूर्वी तेजसला पोटात सारखे दुखत होते. त्याला वारंवार ताप येत होता. त्यामुळे त्याला उत्तुर येथे खाजगी दवाखान्यात प्राथमिक उपचार केले. त्यानंतर गडहिंग्लज येथे पुढील उपचारासाठी आणण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. 

तेजस उत्तूर विद्यालय येथे इयत्ता नववी मध्ये शिकत होता. स्वभावाने मनमिळाऊ, प्रामाणिक व नम्र असा तेजस विद्यार्थ्यांचा लाडका होता. त्याचे वडील मुंबईला सुरक्षा रक्षकाचे काम करतात. पेंढारवाडी येथे आई शेतीकाम करत तेजस व त्याच्या बहिणीला सांभाळते. त्याच्या जाण्याने पेंढारवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 

Web Title: Stomach ache and frequent fever; Unfortunate death of school students in Pendharwadi kolhapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.