शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
2
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
3
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
4
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
5
"ये तो होना ही था..." अरविंदर सिंग लवलींच्या राजीनाम्यानंतर भाजपा नेत्यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
6
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
7
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
8
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
9
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
10
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
11
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
12
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
13
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
14
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
15
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
16
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
17
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
18
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
19
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
20
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा

सीपीआरमध्ये भूलतज्ञांऐवजी अजूनही रखडल्या शस्त्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 1:26 PM

CprHospital Kolhapur -शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर तातडीने ९ जानेवारीला रात्री भूलतज्ज्ञ म्हणून आदेश काढला गेला; पण ते डॉ. दीपक शिंदे हजरच झालेले नाहीत आणि ज्या अनुभवी भूलतज्ज्ञ आहेत त्या डॉ. आरती घोरपडे १५ दिवसांच्या वैद्यकीय रजेवर गेल्या. आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्याच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम सीपीआरच्या प्रशासनाने केले आहे. त्यामुळे बंद असलेल्या हृदयशस्त्रक्रिया अजून सुरूच झालेल्या नाहीत.

ठळक मुद्देसीपीआरमध्ये भूलतज्ञांऐवजी अजूनही रखडल्या शस्त्रक्रिया नुसताच सावळागोंधळ : डॉ. शिंदे हजरच झाले नाहीत, तर डॉ. घोरपडे वैद्यकीय रजेवर

समीर देशपांडेकोल्हापूर : शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर तातडीने ९ जानेवारीला रात्री भूलतज्ज्ञ म्हणून आदेश काढला गेला; पण ते डॉ. दीपक शिंदे हजरच झालेले नाहीत आणि ज्या अनुभवी भूलतज्ज्ञ आहेत त्या डॉ. आरती घोरपडे १५ दिवसांच्या वैद्यकीय रजेवर गेल्या. आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्याच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम सीपीआरच्या प्रशासनाने केले आहे. त्यामुळे बंद असलेल्या हृदयशस्त्रक्रिया अजून सुरूच झालेल्या नाहीत.भूलतज्ज्ञ उपलब्ध करून दिला जात नसल्याने हृदय शस्त्रक्रिया बंद असल्याचे वृत्त शुक्रवार, दि. ८ जानेवारीला ह्यलोकमतह्णच्या अंकात प्रसिद्ध झाले होते. याची दखल घेत शिवसेनेने सीपीआर प्रशासनावर नऊ जानेवारीला हल्लाबोल केला. जिल्हाप्रमुख विजय देवणे आणि संजय पवार यांनी अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे यांच्याशी चर्चा करून सोमवारी जर भूलतज्ज्ञ मिळाला नाही, तर खुर्चीत बसू देणार नाही असा इशारा दिला. यावेळी भूलतज्ज्ञ आणि हृदयशस्त्रक्रिया विभागाच्या डॉक्टरांमध्ये शाब्दिक चकमकही उडाली.या बैठकीनंतर ९ जानेवारीला रात्रीच बधिरीकरणशास्त्र विभागाचे सहायक प्राध्यापक डॉ. दीपक शिंदे यांना भूलतज्ज्ञ म्हणून हृदयशस्त्रक्रिया विभागाकडे हजर होण्याचे आदेश काढण्यात आले. परंतु, ते या विभागाकडे हजरच झाले नाहीत. याच दरम्यान ज्या वरिष्ठ आणि अनुभवी भूलतज्ज्ञ आहेत त्या डॉ आरती घोरपडे या १५ दिवसांच्या वैद्यकीय रजेवर गेल्या आहेत.त्यामुळे अजूनही पूर्णवेळ भूलतज्ज्ञाची गरज असताना ती पूर्ण करण्यात आलेली नाही. पुन्हा आता डॉ. हेमलता देसाई यांची भूलतज्ज्ञ म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. त्या याआधीही वैद्यकीय अधिकारी या पदावर कंत्राटी पद्धतीने कार्यरत होत्या आणि भूलतज्ज्ञ म्हणून सेवा देत होत्या. त्यांची आता नेमणूक झाली असली तरी त्यांनी पूर्ण वेळ आठवडाभर सेवा देणे शक्य नसल्याचे आधीच स्पष्ट केले आहे.

कायमस्वरूपी भूलतज्ज्ञ द्या जेणेकरून हृदयशस्त्रक्रिया विभागाच्या शस्त्रक्रिया सुरू राहतील, अशी या विभागाच्या डॉक्टरांची मागणी आहे. परंतु, जे नेमले ते हजर झाले नाहीत, ज्यांना नेमा म्हणून मागणी आहे त्या घोरपडे वैद्यकीय रजेवर आणि ज्या पूर्ण आठवडाभर येऊ शकणार नाहीत त्यांची नियुक्ती असा कारभार सुरू आहे.बुधवारी होणार होता गोंधळबुधवारी, १३ जानेवारीला अचानक एका रुग्णावर शस्त्रक्रिया करण्याची वेळ आली. परंतु नियुक्ती आदेश दिलेले भूलतज्ज्ञ आले नाहीत. अखेर यावरून रात्रीच सीपीआरमध्ये वादंग होण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे डॉ. हेमलता देसाई यांना यावेळी उपस्थित राहण्यास सांगण्यात आले.आरोग्य राज्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच गोंधळआरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील या जिल्ह्यातील. ते शिवसेनेच्या कोट्यातून झालेले मंत्री. त्यांच्याच जिल्हाप्रमुखांनी हा प्रश्न लावून धरलेला. भूलतज्ज्ञ दिल्याचे लेखी पत्रही बैठकीनंतर दिलेले. परंतु, शिवसेनेसह सर्वांचीच फसवणूक झाली असे आता स्पष्ट झाले आहे. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्यानंतर तरी मंत्री लक्ष देणार का, अशी विचारणा होत आहे.

टॅग्स :CPR Hospitalछत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयkolhapurकोल्हापूर