शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
2
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
3
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
4
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
5
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
6
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
8
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
9
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
10
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
11
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
12
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
13
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
14
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
15
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
16
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
17
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
18
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
19
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
20
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
Daily Top 2Weekly Top 5

राज्याला मिळणार नवे २,८९२ आरोग्य अधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:57 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे घेतलेल्या एक्झिट एक्झाममध्ये राज्यातील २,८९२ उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे घेतलेल्या एक्झिट एक्झाममध्ये राज्यातील २,८९२ उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे त्यांची १५ हून अधिक जिल्ह्यांत आरोग्य उपकेंद्रांवर नियुक्ती करण्यात येणार आहेत. येत्या आठवड्यात नियुक्तीचे आदेश देण्यात येणार आहेत.

ग्रामीण भागातील आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी प्रत्येक आरोग्य केंद्रावर समुदाय आरोग्य अधिकारी नियुक्त करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. १५ जिल्ह्यांमधील याबाबतची प्रक्रिया आधीच पूर्ण झाली आहे. आता राज्यातील उर्वरित जिल्ह्यांसाठी ही प्रक्रिया राबविण्यात आली आहे.

समुदाय आरोग्य अधिकारी पदासाठी तीन टप्प्यांत परीक्षा घेण्यात आली. अंतिम लेखी परीक्षेसाठी ३,०५१ उमेदवार बसले होते. त्यातील २,८९२ जण उत्तीर्ण झाले आहेत. गुणवत्तेनुसार त्यांची समुपदेश तत्त्वानुसार उपकेंद्रांवर नियुक्ती करायची आहे. त्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून, जिल्हा आरोग्य अधिकारी, आरोग्य उपसंचालक सदस्य, तर जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक समितीचे सचिव राहणार आहेत. १० डिसेंबरपर्यंत नव्या आरोग्य अधिकाऱ्यांनी कामाच्या ठिकाणी रुजू व्हायचे आहे.

---------------------------

तीन वर्षे सेवा न केल्यास १ लाख रुपये दंड

या उमेदवारांना सहा महिने नाशिक येथे प्रशिक्षण देण्यात आले. त्यात त्यांना प्रतिमहिना १० हजार रुपये विद्यावेतन दिले. नियुक्ती झाल्यानंतर कराराप्रमाणे जिल्ह्यात ३ वर्षे सेवा न केल्यास आरोग्य अधिकाऱ्यांना १ लाख ३ हजार रुपये दंड करण्यात येणार आहे.