शिवाजी भोसले यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:28 IST2021-09-04T04:28:55+5:302021-09-04T04:28:55+5:30

शिवाजी भोसले यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मुरगूड ता. कागल येथील व कोल्हापूर येथील सन्मित्र विद्यालयाचे मुख्याध्यापक शिवाजी भोसले ...

State level ideal teacher award to Shivaji Bhosale | शिवाजी भोसले यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार

शिवाजी भोसले यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार

शिवाजी भोसले यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार

मुरगूड ता. कागल येथील व कोल्हापूर येथील सन्मित्र विद्यालयाचे मुख्याध्यापक शिवाजी भोसले यांना नॅशनल रूरल डेव्हलपमेंट फाउंडेशन बेळगाव यांच्यामार्फत राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला आहे. या संस्थेमार्फत महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा येथील सामाजिक, शैक्षणिक व वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तीस सन्मानित करण्यात येते. शिवाजी भोसले यांना आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. शिवाजी भोसले यांना मुख्याध्यापक पदा बरोबरच खाजगी शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन, राज्यस्तरीय सचिव व शिक्षण क्षेत्रातील भरीव उल्लेखनीय कामकाजामुळे हा पुरस्कार देण्यात येत आहे. पाच सप्टेंबर रोजी चिकोडी जिल्हा बेळगाव येथे माजी केंद्रीय मंत्री रत्नमाला सावनूर ,माजी खासदार बॅरिस्टर अमरसिंह पाटील, माजी खासदार सुधीर सावंत यांच्या हस्ते देण्यात येणार आहे.

हा पुरस्कार मिळणेसाठी लक्ष्मी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष वसंतराव देशमुख ,नगरसेवक शारंगधर देशमुख ,राज्याध्यक्ष भरत रसाळे ,आनंदा हिरुगडे, शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन महादेव डावरे यांचे सहकार्य लाभले.

Web Title: State level ideal teacher award to Shivaji Bhosale