कोल्हापुरात १३, १४ ला राज्यस्तरीय हास्ययोग परिषद

By Admin | Updated: December 6, 2014 00:32 IST2014-12-06T00:01:08+5:302014-12-06T00:32:28+5:30

कोल्हापुरात २५ हास्यक्लब--लाफ्टर क्लब डॉक्युमेंट्री

State-level Comedy Council on Kolhapur on 13th, 14th | कोल्हापुरात १३, १४ ला राज्यस्तरीय हास्ययोग परिषद

कोल्हापुरात १३, १४ ला राज्यस्तरीय हास्ययोग परिषद

कोल्हापूर : सहावी राज्यस्तरीय हास्ययोग परिषद १३ व १४ डिसेंबरला कोल्हापुरात होणार आहे, अशी माहिती राजर्षी शाहू छत्रपती हास्ययोग परिवारचे अध्यक्ष डॉ. दिलीप शहा यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शहा म्हणाले, ही परिषद ड्रीमवर्ल्ड वॉटरपार्कमध्ये सकाळी आठ ते रात्री दहा या वेळेत होणाऱ्या या परिषदेसाठी राज्यभरातून हास्यक्लबचे सदस्य येणार आहेत. माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील या परिषदेचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. यावेळी उपमहापौर मोहन गोंजारे उपस्थित राहणार आहेत. येथील सर्व हास्य क्लबच्यावतीने परिषदेचे संयोजन केले आहे.
कोल्हापुरात प्रथमच होणाऱ्या या हास्य परिषदेत डॉ. मदन कटारिया, माधुरी कटारिया, हास्ययोगतज्ज्ञ डॉ. धनंजय गुंडे, पुण्याचे मानसोपचारतज्ज्ञ चिंतामणी कुलकर्णी, पुण्याचे डॉ. शिरीष गुजर, महाराष्ट्र हास्ययोग संघाचे अध्यक्ष सुषमा दुगड, पुण्याचे विठ्ठल काटे, डॉ. सुभाष देसाई, मकरंद टिल्लू, ठाण्याचे माधव मस्के, हास्यगुरू कमलेश मसालेवाला, आदी मार्गदर्शन करणार आहेत. हास्य स्पर्धा, हास्य दिंडी, हास्य व डान्स मेडिटेशन होणार आहे. नावनोंदणी यापूर्वीच झाली आहे. मात्र, १४ डिसेंबरला सायंकाळी होणाऱ्या डॉ. मदन कटारिया यांच्या व्याख्यानाचा लाभ सर्वांना घेता येईल.
यावेळी उपाध्यक्ष एन. पी. मदने, सचिव पी. एम. देशपांडे, ज्ञानेश्वर भस्मे, सी. एम. पारेख, दिलीप कोण्णूर, डी. टी. चौधरी, प्रफुल्ल महाजन, शिवकुमार हिरेमठ, एल. एस. पाटोळे उपस्थित होते. (प्रतिनिधी)

कोल्हापुरात २५ हास्यक्लब
फिजिशियन असलेल्या डॉ. कटारिया यांनी जगातला पहिला हास्य क्लब १३ एप्रिल १९९५ मध्ये लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये सुरू केला. त्यांनी हास्य चळवळीसाठी स्वत:ला वाहून घेतले असून, बंगलोरमध्ये हास्ययोग युनिव्हर्सिटी सुरू केली आहे. देशात सध्या जवळपास दहा हजार हास्यक्लब आहेत. कोल्हापुरात डॉ. धनंजय गुंडे यांनी २० जानेवारी १९९८ मध्ये पहिला हास्यक्लब सुरू केला. आता शहरात २५ व जिल्ह्यात ४५ हास्यक्लब कार्यरत असून, आणखी शाखा निर्माण होत आहेत.


लाफ्टर क्लब डॉक्युमेंट्री
नील डेवेन पोट्र या निर्मात्याने कोल्हापूर, पेठवडगांव, इचलकरंजी, सांगली, पुणे, चंदीगड येथे व परदेशात चित्रीकरण करून लाफ्ट क्लब नावाची एक तासाची डॉक्युमेंटरी तयार केली आहे. त्याचा वर्ल्ड प्रीमियर या परिषदेत केला जाणार आहे.

Web Title: State-level Comedy Council on Kolhapur on 13th, 14th