शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

स्टार ११९६... रात्री १२ नंतर शहरात रस्त्यांवर फिरतात तरी कोण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:26 IST

समीर देशपांडे लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : प्रत्येक शहराची रात्री बारानंतरची स्थिती वेगवेगळी असते. मुंबईसारख्या ठिकाणी रात्री ...

समीर देशपांडे

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : प्रत्येक शहराची रात्री बारानंतरची स्थिती वेगवेगळी असते. मुंबईसारख्या ठिकाणी रात्री उशिरापर्यंत व्यवहार सुरू असतात. अजूनही अनेक विकासाभिमुख जिल्ह्यांमध्ये रात्री बारापर्यंत सामसूम झालेली असते. जेव्हा चित्रपटगृहे सुरू होती तेव्हा रात्री साडेबारा वाजेपर्यंत सर्वत्रच हालचाल होती. कोल्हापुरात रात्री एक वाजेपर्यंत रस्त्यावरून ये- जा सुरू असते; परंतु आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावरदेखील मर्यादा आल्या आहेत.

कोल्हापुरात चौकाचौकांत, कट्ट्याकट्ट्यांवर बसून गप्पा मारण्याची मोठी हौस. एकदा रात्री अकरापर्यंत जेवणे आटोपली की, कट्ट्यावर ठिय्या मारायचा आणि मग जागतिक घडामोडींपासून तालमीच्या परिसरात काय चालू आहे, इथपर्यंतच्या सगळ्या चर्चा रंगतात. कोरोनाच्या आधीपर्यंत रात्री १२ वाजताही जेवण कुठे मिळणार, चहा, दूध कुठे मिळणार, गरम नाश्त्याची सोय कुठे याची ठिकाणे निश्चित होती. गंगावेशीमध्ये तर पहाटे साडेतीन, चार वाजताही शिरा, उप्पीट, पोहे, चहाची व्यवस्था व्हायची; परंतु आता कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर परिस्थिती बदलली आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी रात्री केलेला हा रिॲलिटी चेक.

१ तीन कॉलम फोटो

२१०९२०२१ कोल स्टार ११९६

दसरा चौक, कोल्हापूर ०१.०० एएम

(छाया : आदित्य वेल्हाळ)

चौकट

शहरात रात्रीची गस्त

चारचाकी वाहने ५

दुचाकी वाहने २०

पोलीस १०५

चौकट

प्रवाशांची संख्या जास्त

दाभोलकर कॉनर्र १२.२५ एएम

बसस्थानक आणि रेल्वेस्थानक यादरम्यानचा शहरातील सर्वांत वर्दळीचा हा चौक. त्यामुळे या ठिकाणी प्रवाशांचीच वर्दळ जास्त. पूर्वीसारख्या बसेस सुरू नसल्या तरी काही खासगी बसेस निघून गेल्या होत्या, तर काही बाहेरगावाहून येणार होत्या. त्यामुळे त्यातून जाणारे प्रवासी, रिक्षाचालक आणि फिरस्ते हेच रस्त्यावरून दिसतात. मध्येच सायरन वाजवत येणारी पोलिसांच्या गस्ती पथकाची गाडी शांतता भंग करते.

चौकट

सुनसान दसरा चौक १२.५० एएम

शहरातील आणखी एक महत्त्वाचा चौक म्हणजे दसरा चौक. हा चौक सुनसान. मधूनच कोकणाकडे जाणारे दोन मालवाहू ट्रक यामार्गे जातात. वृत्तपत्रांमधील काम आटोपून कर्मचारी घरी निघालेले. रात्री उशिरापर्यंत पार्ट्यांना गेलेले ट्रिपल सीट भरधाव निघालेले. एमआयडीसीमधून रात्रपाळीच्या कर्मचाऱ्यांना घेऊन आलेली कंपनीची गाडी दसरा चौकाच्या मैदानावर थांबते. डोक्यावर हेल्मेट आणि पाठीला सॅक लावलेली तरुण मुले काम आटोपून घरी निघालेली.

चौकट

मिरजकर तिकटी १.१५ एएम

शांत मिरजकर तिकटी. जेऊन हॉटेलच्या बाहेर पडलेल्या पाच, सहा तरुण पोरांचा कल्ला चाललेला. फिरस्ती आजी. प्लास्टिकच्या पिशव्या गोळा करत निघालेली. हॉटेलमधील काम आवरल्याने खोलीकडे चालत निघालेली विशीतील दोन मुले. गल्लीतच शतपावली घालणारे तिघांचे एक कुटुंब.

चौकट

पोलिसांची गस्त, म्हणून आपली झोप मस्त

हे सर्व निरीक्षण नोंदवत असताना पोलिसांच्या गाड्या सातत्याने सायरन वाजवत फिरत असल्याचे दिसून आले. उशिरा सुरू असलेली हॉटेल्स बंद करण्यात आली. गल्लीबोळांच्या तोंडावर उभारलेल्या तरुणांना घरी पिटाळण्यात आले. भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकी थांबवून चौकशी करण्यात येत होती. खरोखरच हे पोलीस बांधव रात्रंदिवस कार्यरत आहेत, त्यांची गस्त आहे, म्हणून आपण मस्त झोप घेऊ शकतो, हे वास्तव आहे.

कोट

रात्रीची गस्त शिस्तबद्ध पद्धतीने झाली पाहिजे याबाबत सर्वांना सूचना दिल्या असून, तशी अंमलबजावणी सुरू आहे. नागरिकांनीही काही संशयास्पद बाबी वाटल्यास त्या पोलिसांपर्यंत तातडीने कळवल्या पाहिजेत.

-शैलेश बलकवडे,

जिल्हा पोलीस अधीक्षक, कोल्हापूर

२१०९२०२१ कोल स्टार ११९६ डमी