शहरं
Join us  
Trending Stories
1
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
2
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
3
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
4
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
5
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
6
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
7
Latest Marathi News LIVE Updates: भाजपाने मतदारसंघ पुनर्रचना केलेल्या अधिकाऱ्यांनाच नोकरीवर घेतले, रोहित पवारांचा आरोप
8
सोलापूर-पुण्याहूनही सुटणार पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन? जाणून घ्या, कुठे जाणार अन् थांबणार!
9
चीनने इराणला पाठवले मिसाईल्ससाठीचे केमिकल्स, अमेरिकेने पकडलेल्या जहाजात सापडला साठा; निक्की हेलींचा दावा
10
माजी क्रिकेटपटू, तृणमूल खासदार युसूफ पठाणचे सासरे आणि मेहुण्याला अटक, मुंबई पोलिसांनी केली कारवाई
11
अरे बापरे! मोमोज खाणं ठरलं जीवघेणं; १० वर्षांच्या मुलीचं लिव्हर फेल, आठवेना, चालताही येईना
12
ट्रम्प आता पाकिस्तानचेही ऐकेनात, इराणला दिली उघड धमकी; म्हणाले, “करार होत नाही तोपर्यंत...”
13
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर येणार तात्पुरती टाच; 'अशी' होणार कुटुंबियांची अडचण
14
MHADA Lottery: गिरणी कामगारांच्या २,५२१ घरांच्या लॉटरीला विलंब लागण्याची चिन्हे 
15
जिनिलियाचं रितेशवरील प्रेम पाहून भारावली भाग्यश्री, 'राजा शिवाजी' सेटवरचा किस्सा सांगत म्हणाली...
16
Video - संतापजनक! "तू क्यूट दिसतेस, एकटीच राहतेस का?"; रॅपिडो ड्रायव्हरचा तरुणीला मेसेज
17
Apple च्या CEO पदी नियुक्ती; कोण आहेत जॉन टर्नस? टिम कुक यांची जागा घेणार...
18
IPL 2026: सूर्यकुमार यादवचा 'फ्लॉप शो' सुरूच, ६ पैकी ५ सामन्यात 'फेल'; MI संघाबाहेर काढणार?
19
Mamata Banerjee : "माझं विमान रनवेवर मुद्दाम ३० मिनिटं थांबवलं, याचा बदला घेऊ"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
20
Vastu Tips: वारंवार येणारे अडथळे आणि आर्थिक चणचण? वास्तुशास्त्राचे 'हे' सोपे उपाय ठरतील रामबाण!
Daily Top 2Weekly Top 5

सहलीसाठी एस.टी. सुरक्षित

By admin | Updated: November 28, 2014 00:03 IST

शाळांचे प्राधान्य : वर्षभरात सुमारे एक हजार एस.टी. बसेसची नोंदणी

प्रदीप शिंदे - कोल्हापूर -चार भिंतींच्या आतील शिक्षणासह व्यावहारिक जगाचे ज्ञान मिळावे, या उद्देशाने शाळांकडून विद्यार्थी सहलींचे नियोजन केले जाते. पण, गेल्या काही वर्षांपासून सहलींसाठी खासगी आरामगाड्या घेण्याची प्रथा सुरू झाली. त्यातील अपघातांचे प्रकार घडल्यानंतर आता अनेक शाळा दक्ष झाल्या आहेत.त्यामुळे या शाळांकडून एस.टी. बसला पसंती मिळत आहे.गेल्यावर्षी कोल्हापूर जिल्ह्यांतील शाळांनी राज्य परिवहन महामंडळाच्या दहा आगारांतून एक हजार १३३ एस.टी.बसची नोंदणी करून ‘एस.टी.बसचा प्रवास, सुरक्षित प्रवास’ हे कृतीतून दाखवून दिले आहे. प्राथमिक आणि माध्यमिक अशा दोन्ही स्तरांवर डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारीत या सहलींचे आयोजन करण्यात येते. महामंडळाच्यावतीने विद्यार्थ्यांच्या सहलींसाठी प्रासंगिक करारावर महामंडळाकडून ५० टक्के सवलतीने गाड्या दिल्या जातात. त्यांच्यासाठी ४५ आसनांच्या गाड्या पुरविल्या जातात. तसेच प्रत्येक विद्यार्थ्याचे नाव, इयत्ता, जन्मतारीख यांची नोंद घेतल्याशिवाय संबंधित शाळेला सहलीसाठी गाडी दिली जात नाही. तसेच एका बसमध्ये दोन शिक्षक किंवा दोन सहकर्मचारी असे एकूण चौघांना बसण्याची परवानगी दिली जाते. शैक्षणिक सहलीला एस.टी.नेच जा, असा सल्ला शिक्षण विभाग देत असला, तरी अनेक शाळा खासगी गाड्यांना पसंती देतात. यामुळे काही वेळा अपघात घडले आहेत. त्यामुळेच जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाकडून शालेय सहलीसाठी एस.टी. बस असल्याशिवाय परवानगीच दिली जात नाही. काही खासगी शाळांना याचे बंधन नसल्याने ते खासगी वाहन घेऊन सहलीला जातात. यासाठी शैक्षणिक विभागाच्यावतीने कडक पावले उचलण्याची गरज आहे. ५0 टक्के सवलतराज्य परिवहन महामंडळातर्फे शैक्षणिक सहलीसाठी शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना नैमित्तिक कराराच्या दरात ५० टक्के सवलत देण्यात येते. एस.टी.चे चालक हे प्रशिक्षित असतात. सर्व गाड्यांची वेळच्या वेळी देखभाल-दुरुस्ती केली जाते. त्यामुळे सुरक्षित व सोईस्कर प्रवासासाठी शाळा राज्य शासनाच्या एस.टी.चा वापर करतात. शालेय सहलीसाठी एस.टी.चा वापर करण्यासाठी विभाग नियंत्रकांमार्फत आम्ही शिक्षण उपसंचालक व शिक्षण अधिकारी यांना आवाहन केले आहे. गतवर्षी कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकावरून १६७ एस.टी. सहलीसाठी गेल्या होत्या. यंदा २०० गाड्या पुरविण्याचा आमचा मानस आहे. - अभय कदम,स्थानक प्रमुख, मध्यवर्ती बसस्थानक कोल्हापूर