Kolhapur: वळणावर गिअर बदलताना एसटी बस मागे येवून दुचाकीस धडकली; विद्यार्थीनी ठार, वडील जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2024 14:10 IST2024-08-14T14:09:30+5:302024-08-14T14:10:45+5:30
गडहिंग्लज: वळणावर गिअर बदलताना चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बस अचानक वेगाने मागे येवून दुचाकीस धडकली. या धडकेत दुचाकीस्वार संजना ...

Kolhapur: वळणावर गिअर बदलताना एसटी बस मागे येवून दुचाकीस धडकली; विद्यार्थीनी ठार, वडील जखमी
गडहिंग्लज: वळणावर गिअर बदलताना चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बस अचानक वेगाने मागे येवून दुचाकीस धडकली. या धडकेत दुचाकीस्वार संजना आनंदा हुदली (वय १९) या महाविद्यालयीन विद्यार्थीनीचा दुर्दैवी मृत्यू झाला. दुचाकीवरमागे बसलेले तिचे वडील आनंदा हुदली (४९, रा.भडगाव ता. गडहिंग्लज) हे गंभीर जखमी झाले. या घटनेमुळे गडहिंग्लज परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, भडगाव येथील आनंदा हुदली हे चिंचेवाडी येथील फार्मसी महाविद्यालयात लेखनीक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची मुलगी संजना ही त्याच महाविद्यालयात फार्मसीच्या दुसऱ्या वर्षाला शिकत होती. सकाळी साडेदहाच्या सुमारास संजना व आनंदा हे दुचाकीवरून महाविद्यालयाकडे निघाले होते. दरम्यान, गडहिंग्लजहून हसूरवाडीकडे निघालेली बस त्यांच्या पुढे होती. बेरडवाडीनजीकच्या वळणावर गिअर बदलताना चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बस अचानक वेगाने मागे आली. त्यावेळी एसटीच्या धडकेमुळे पाठीमागून येणारी त्यांची दुचाकी एस.टी.च्या पाठीमागील चाकात अडकली.
अपघातात संजना व आनंदा दोघेही गंभीर जखमी झाले. उपचारासाठी त्यांना येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले.परंतु, उपचारापूर्वीच तिची मृत्यू झाला. आनंदा यांच्यावर उपचार सुरू आहेत. गडहिंग्लज पोलिसांत अपघाताची नोंद झाली आहे.