एसटी बसचा ब्रेक निकामी झाल्याने समोरील वाहनांना धडक, दोघे जखमी; किणी टोलनाक्यावरील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2022 18:09 IST2022-05-12T18:08:18+5:302022-05-12T18:09:02+5:30

किणी : किणी टोलनाक्यावर अचानक एसटी बसचा ब्रेक निकामी झाल्याने अपघात झाला. यावेळी समोरील गाड्यांना एसटी बसची जोराची धडक ...

ST bus brakes fail, hit vehicles in front, two injured; Incident at Kini Toll naka | एसटी बसचा ब्रेक निकामी झाल्याने समोरील वाहनांना धडक, दोघे जखमी; किणी टोलनाक्यावरील घटना

एसटी बसचा ब्रेक निकामी झाल्याने समोरील वाहनांना धडक, दोघे जखमी; किणी टोलनाक्यावरील घटना

किणी : किणी टोलनाक्यावर अचानक एसटी बसचा ब्रेक निकामी झाल्याने अपघात झाला. यावेळी समोरील गाड्यांना एसटी बसची जोराची धडक झाली. या धडकेत दोघे गंभीर जखमी झाले. आज, गुरुवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली.

कोल्हापूर-बेळगाव फलक असणारी ही एसटी बस कोल्हापूरला येत होती. किणी टोलनाक्या जवळ या बसचा ब्रेक निकामी झाला. अचानक ब्रेक निकामी झाल्याने बसची समोरील वाहनांना धडक झाली. यात दोघे गंभीर जखमी झाले असून गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

Web Title: ST bus brakes fail, hit vehicles in front, two injured; Incident at Kini Toll naka