ssc exam: जयसिंगपुरात दहावीचा पेपर फुटल्याची अफवा, परीक्षा विभागाचा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2022 12:08 IST2022-03-30T11:17:34+5:302022-03-30T12:08:01+5:30
जयसिंगपूर : दहावीचा विज्ञान आणि तंत्रज्ञान-२ विषयाचा पेपर फुटल्याने शहरात आज, बुधवारी खळबळ उडाली होती. गतवर्षीच्या पेपरमधील तारखेत खाडाखोड ...

ssc exam: जयसिंगपुरात दहावीचा पेपर फुटल्याची अफवा, परीक्षा विभागाचा खुलासा
जयसिंगपूर : दहावीचा विज्ञान आणि तंत्रज्ञान-२ विषयाचा पेपर फुटल्याने शहरात आज, बुधवारी खळबळ उडाली होती. गतवर्षीच्या पेपरमधील तारखेत खाडाखोड करुन खोडसाळपणे केल्याचे समोर आले आहे. याबाबत खातरजमा केली असून पेपर फुटल्याची माहिती चुकीची असल्याचा खुलासा परीक्षा विभागाने केला आहे.
शहरातील एका शाळेत मुख्य केंद्र असून येथून तालुक्यातील शाळांमध्ये पेपर दिले जातात. दरम्यान विज्ञान आणि तंत्रज्ञान-२ विषयाचा पेपर मंगळवारीच फुटल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांनी गटशिक्षणाधिकारी व पोलीस अधिकाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. घटनेचे गाभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी केद्रावर भेट देऊन माहिती घेतली.
केवळ पाचशे रुपयांना पेपर विक्री होत असल्याचा आरोपही यावेळी सामाजिक कार्यकर्त्यांनी केला. तर जबाबदार असणाऱ्या शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करावी अशीही मागणी केली. या प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली. मात्र प्रत्यक्षात परीक्षा विभागाने खातरजमा केली असता मागील वर्षीच्या पेपरमधील तारखेत खाडाखोड करुन तो पेपर सोशल मिडीयावर व्हायरल करण्यात आला त्यामुळे पेपर फुटल्याची अखेर अफवाच ठरली.
पेपर फुटल्याची माहिती चुकीची आहे. गतवर्षीच्या पेपरमधील तारखेत खाडाखोड करुन तो पेपर सोशल मीडिया टाकण्यात आला आहे. - डी.एस.पवार, सहाय्यक सचिव परीक्षा विभाग कोल्हापूर