शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

झोपडपट्ट्यांवर ‘विशेष वॉच’

By admin | Updated: October 10, 2014 00:28 IST

विधानसभा निवडणूक : कोल्हापूर शहरात १७ ठिकाणे संवेदनशील

एकनाथ पाटील - कोल्हापूर -पैसा, भेटवस्तूंसह दारू वाटण्याचे काम गुन्हेगारच करू शकतात. पैशांचे आमिष दाखवून त्यांचा विधानसभा निवडणुकीत सर्रास वापर होण्याची दाट शक्यता असल्याने शहरातील संवेदनशील १७ झोपडपट्टी वसाहतींमध्ये पोलिसांनी ‘विशेष वॉच’ ठेवला आहे. शहरातील ‘दादा’, ‘भार्इं’ यांच्या बारीक हालचालींवर करडी नजर ठेवण्यात आली आहे. त्यामुळे झोपडपट्टी परिसरात राजरोस चालणारी भाईगिरी, अवैध धंदे थंड पडले आहेत. शहरातील झोपडपट्टी परिसर विशेषत: पोलिसांच्या सुरुवातीपासून रडारवर आहे. ‘गुन्हेगारांचे माहेरघर’ अशी ओळख शहरातील विशेषत: झोपडपट्टींची आहे. ‘भाईगिरी’च्या जोरावर दमदाटी करून पैसे उकळणे, चोऱ्या, घरफोडी करण्यामध्ये येथील तरुण-महिला आघाडीवर आहेत. पैशांसाठी वाट्टेल ते करणारे सुपारीबहाद्दूूर स्थानिक राजकीय नेते व सावकारांच्या दावणीला बांधले आहेत. निवडणूक, व्यवसायातील वसुली, कूळ काढणे, आदींसाठी येथील तरुणांचा वापर केला जात आहे. खून, खुनाचा प्रयत्न, दरोडे, चोऱ्या, हाणामारीसारखे गंभीर गुन्हे दाखल असलेले सराईत गुन्हेगारांचे उठणे-बसणे या झोपडपट्ट्यांमधूनच आहे. निवडणुकीत ‘साम-दाम-दंड-भेद’ या नीतिचा वापर करावाच लागतो. त्याची विशेष जबाबदारी या झोपडपट्टीदादांकडे दिली जाते. त्यामुळे निवडणूक काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी झोपडपट्ट्यांवर विशेष लक्ष ठेवावे लागते. त्याचबरोबर परजिल्ह्यांतून आलेल्या गुन्हेगारांचे कनेक्शन हे झोपडपट्टीमधूनच होत असते. बहुतांशी हद्दपार गुन्हेगार झोपडपट्टीमध्ये येऊन वास्तव करतात. ‘एकमेका साह्य करू, अवघे धरू सुपंथ’ या म्हणीप्रमाणे झोपडपट्टींमधून देवाण-घेवाण होत असते. शहरात शाहूपुरी, राजारामपुरी व जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये संवेदनशील झोपडपट्ट्या आहेत. त्यामध्ये राजेंद्रनगर, जवाहरनगर, सुभाषनगर, टेंबलाईवाडी, विक्रमनगर, शाहूनगर, यादवनगर, कनाननगर, सदर बाजार, शिवाजी पार्क, सुधाकर जोशीनगर, गंजीमाळ, बिडी कामगार चाळ, वारे वसाहत आदींचा समावेश आहे. या झोपडपट्ट्यांतील ‘दादा’, ‘भार्इं’ यांच्यावर ‘विशेष वॉच’ ठेवण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी दिले आहेत. त्यानुसार पोलिसांची विशेष पथके दिवसा, रात्री-अपरात्री केव्हाही, कुठल्याही क्षणाला झोपडपट्टी परिसरात फेरफटका मारत येथील प्रत्येक व्यक्तीच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे. गुप्तहेर यंत्रणा लागली कामाला; प्रबोधनावरही भरविधानसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यांमध्ये अनेक छुप्या घडामोडींना वेग चढणार आहे. त्यासाठी पोलिसांनी रस्त्यांवरील फिरस्ते, वेश्या महिला, पानपट्टीचालक, रिक्षाचालक, बूट पॉलिशवाले अशा गुप्तहेरांना गल्ली-बोळांत, चौकांत, लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. कुठे काय घडले, कोणी केले, याची परिपूर्ण माहिती हे ‘विशेष गुप्तहेर’ पोलिसांना देत आहेत. कट्टा व मोहल्ला येथे बैठका घेऊन लोकांच्यात मतदानाबाबत प्रबोधन केले जात आहे. मतदानासाठी पैशांचा किंवा भेटवस्तूंचा मोह टाळावा. दारू, मटका, जुगार सुरू ठेवल्यास कठोर कारवाई केली जाईल. हद्दपार गुन्हेगारांना आसरा देऊ नये, पोलिसांना त्याची कल्पना द्यावी, कोणाच्याही दमदाटी, धमकीला बळी पडू नका, अशा पद्धतीने प्रबोधनावर जोर ठेवला आहे.