शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

इचलकरंजी पालिकेतील विशेष सभा बेकायदेशीर- शशांक बावचकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 1:02 AM

घरफाळा कपात आणि कृष्णा नळ योजनेची दाबनलिका बदलणे अशा महत्त्वाच्या विषयांवर नगराध्यक्ष अ‍ॅड. अलका स्वामी यांनी सोमवारी (दि.१८) विशेष सभा आयोजित केली आहे. मात्र, दोन्ही विषयांच्या फाईल्स तयार नसल्याने सभा

ठळक मुद्देफाईल्स प्रशासनाकडे नाहीत

इचलकरंजी : घरफाळा कपात आणि कृष्णा नळ योजनेची दाबनलिका बदलणे अशा महत्त्वाच्या विषयांवर नगराध्यक्ष अ‍ॅड. अलका स्वामी यांनी सोमवारी (दि.१८) विशेष सभा आयोजित केली आहे. मात्र, दोन्ही विषयांच्या फाईल्स तयार नसल्याने सभा बेकायदेशीर ठरणार असल्याची माहिती कॉँग्रेसचे नगरसेवक शशांक बावचकर यांनी दिली.

नगरपालिका हद्दीतील सुमारे ५१ हजार मालमत्तांवर अवाजवी व अन्यायी घरफाळा वाढ झाली असल्यामुळे ती कमी करण्यात यावी, अशा आशयाच्या विषयावर मागील वर्षी १० आॅक्टोबर २०१७ ला झालेल्या सभेत घरफाळ्यामध्ये दहा टक्के कपात करण्यात यावी आणि ही कपात एप्रिल २०१८ पासून लागू करावी, असा प्रस्ताव पालिकेच्या सभेत संमत करण्यात आला होता. सभेसाठी उपस्थित असलेले मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांनी या प्रस्तावाला विरोध दर्शविला नव्हता; पण त्यानंतर तब्बल पाच महिन्यांनी १५ मार्च २०१८ रोजी मुख्याधिकारी डॉ. रसाळ यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे घरफाळा कमी करण्याच्या प्रस्तावास स्थगिती द्यावी, अशी मागणी केली. त्याचा परिणाम म्हणून पालिकेच्या उत्पन्नात ३.४० कोटी रुपये घट होणार असल्याचे सांगत घरफाळा कमी करण्याचा प्रस्ताव रद्दबातल ठरविला.

जिल्हाधिकाºयांनी घरफाळा रद्द करण्याचा आदेश २२ मार्च २०१८ रोजी दिला असला तरी त्या आदेशाची प्रत नगराध्यक्षांना मिळालेली नाही. याबाबत सत्तारूढ व विरोधी पक्षामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अशा पार्श्वभूमीवर गुरुवारी (दि. १४) सत्तारूढ भाजप, ताराराणी व राष्टÑवादी यांच्या आघाडीने नगराध्यक्षांकडे घरफाळा कपात करण्याच्या विषयावर विशेष सभा बोलविण्याची मागणी केली. त्यास अनुसरून नगराध्यक्षांनी सोमवारी सभा आयोजित केली, पण या विषयाची फाईल अद्यापही कार्यालयाकडे उपलब्ध नाही, अशी माहिती बावचकर यांनी दिली.२७ कोटींचा प्रस्ताव विलंबामुळे ३५ कोटीकृष्णा नळ योजनेकडील दाबनलिका व पंप बदलण्यासाठी चार वर्षांपूर्वी २७ कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाने मंजूर केला होता. मात्र, वारणा नळ योजना मंजूर झाल्यामुळे हा प्रस्ताव शासनानेच रद्दबातल ठरविला. आता वारणा योजनेस होणाºया विरोधामुळे होणारा विलंब पाहता गळकी झालेल्या कृष्णा नळ योजनेची दाबनलिका बदलणे व पंपांची क्षमता वाढविण्यासाठी नवीन पंप घेणे असा प्रस्ताव दिला जाणार आहे. हा प्रस्ताव सुमारे ३५ कोटी रुपयांवर जाण्याची शक्यता असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारण