Kolhapur Crime: दारूला पैसे दिले नसल्याच्या रागातून आईचा वरवंट्याने ठेचून खून, खुनी मुलाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 13:38 IST2025-10-15T13:37:41+5:302025-10-15T13:38:43+5:30

दारूच्या नशेत मुलाचे कृत्य, राजेंद्रनगर येथील धक्कादायक घटना 

Son kills mother in anger over not paying for alcohol in Kolhapur | Kolhapur Crime: दारूला पैसे दिले नसल्याच्या रागातून आईचा वरवंट्याने ठेचून खून, खुनी मुलाला अटक

Kolhapur Crime: दारूला पैसे दिले नसल्याच्या रागातून आईचा वरवंट्याने ठेचून खून, खुनी मुलाला अटक

कोल्हापूर : दारूला पैसे देत नसल्याच्या रागातून मुलाने आईच्या डोक्यात वरवंटा घालून ठेचून तिचा निर्घृण खून केला. हा प्रकार बुधवारी (दि. १५) सकाळी साडेसहाच्या सुमारास राजेंद्रनगर येथील साळोखे पार्क परिसरात भारतनगरमध्ये घडला. सावित्रीबाई अरुण निकम (वय ५३) असे मृत महिलेचे नाव असून, हल्लेखोर मुलगा विजय अरुण निकम (वय ३५) याला राजारामपुरी पोलिसांनी त्याच्या घरातून अटक केली. 

घटनास्थळ आणि राजारामपुरी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सावित्रीबाई निकम आणि त्यांचा मुलगा विजय हे दोघेच भारतनगर येथली घरात राहत होते. विजय हा व्यसनी असल्याने त्याची पत्नी आणि दोन मुली माहेरी विजापूर येथे जाऊन राहिल्या आहेत. सेंट्रिंग काम आणि डिजिटल फलक लावण्याचे काम करणारा विजय सतत दारूसाठी आईला त्रास देत होता. 

बहिणीला फोन करून दिली माहिती

आज, बुधवारी सकाळी दारूच्या नशेत तो आईकडे पैसे मागत होता. पैसे देण्यास नकार दिल्याने त्याने घरातील वरवंटा डोक्यात घालून आईचा खून केला. त्यानंतर त्यानेच इस्पुर्ली येथील बहिणीला फोन करून आईचा खून केल्याची माहिती दिली. शेजा-यांनाही घटनेची माहिती देऊन तो दारात बसला होता.

परिसरातील नागरिकांनी याची माहिती राजारामपुरी पोलिसांना दिली. पोलिसांनी येऊन हल्लेखोर विजय निकम अटक करून घटनास्थळाचा पंचनामा केला. याबाबत राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

Web Title : कोल्हापुर: शराब के पैसे के लिए बेटे ने पत्थर से मां की हत्या की

Web Summary : कोल्हापुर में शराब के पैसे न मिलने पर एक बेटे ने अपनी मां की पत्थर से हत्या कर दी। घटना राजेंद्रनगर में हुई। आरोपी विजय निकम को राजारामपुरी पुलिस ने अपनी बहन को अपराध के बारे में बताने के बाद गिरफ्तार कर लिया है।

Web Title : Kolhapur: Son Murders Mother with Grinding Stone Over Alcohol Money

Web Summary : In Kolhapur, a son killed his mother with a grinding stone after she refused to give him money for alcohol. The incident occurred in Rajendranagar. The accused, Vijay Nikam, has been arrested by Rajarampuri police after informing his sister about the crime.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.