..तर नवोदिता घाटगेंनी 'ते' प्रकरण मिटवण्यासाठी २० लाख का दिले?, शीतल फराकटे यांची विचारणा

By समीर देशपांडे | Published: June 24, 2024 01:30 PM2024-06-24T13:30:24+5:302024-06-24T13:33:24+5:30

कोल्हापूर : मलेशियाला पाठवलेल्या पार्सलमध्ये काही बेकायदेशीर नव्हते तर नवोदिता समरजित घाटगे यांनी हे प्रकरण मिटवण्यासाठी घाईघाईने २० लाख ...

..So why did Navodita Ghatge pay 20 lakhs to settle the case, asked by Sheetal Farakte | ..तर नवोदिता घाटगेंनी 'ते' प्रकरण मिटवण्यासाठी २० लाख का दिले?, शीतल फराकटे यांची विचारणा

..तर नवोदिता घाटगेंनी 'ते' प्रकरण मिटवण्यासाठी २० लाख का दिले?, शीतल फराकटे यांची विचारणा

कोल्हापूर : मलेशियाला पाठवलेल्या पार्सलमध्ये काही बेकायदेशीर नव्हते तर नवोदिता समरजित घाटगे यांनी हे प्रकरण मिटवण्यासाठी घाईघाईने २० लाख रूपये का दिले आणि अमली पदार्थ, बनावट पासपोर्ट असल्याचे फोनवरून सांगून पत्नीची फसवणूक झाली असताना याबाबत नेहमी पत्रकार परिषदा घेणार समरजित घाटगे आता गप्प का असा सवाल राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महिला जिल्हाध्यक्षा शीतल फराकटे यांनी उपस्थित केला आहे.

याबाबत त्यांनी सोमवारी दुपारी पत्रकार परिषद घेवून हा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे द्यावा अशी मागणीही त्यांनी केली. त्या म्हणाल्या, नवोदिता घाटगे यांनी मलेशियाला पाठवलेल्या पार्सलच्या आधारे २ ते ५ जूनच्या दरम्यान त्यांची २० लाख रूपयांची फसवणूक झाली आहे. ही मागणी झाल्यानंतर त्याक्षणी त्यांनी पोलिसात तक्रार द्यायला हवी होती. 

त्यांचे पती समरजित आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे घरचे संबंध असतानाही अजूनही गुन्हेगारांच्या मुसक्या कशा आवळल्या नाहीत, ज्या बॅंक खात्यावर हे पैसे वर्ग झाले त्या बॅंक खात्यांचा शोध अद्याप का लागला नाही अशी विचारणा त्यांनी यावेळी केली. यावेळी माधवी मोरबाळे, रेखा आवळे, पदमजा भालबर, जहिदा मुजावर, शहनाज अत्तार, पूजा साळोखे यांच्यासह महिला उपस्थित होत्या. याबाबत या सर्वांनी अतिरिक्त पोलिस अधीक्षक जयश्री देसाई यांनाही निवेदन दिले.

Web Title: ..So why did Navodita Ghatge pay 20 lakhs to settle the case, asked by Sheetal Farakte

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.