शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

‘स्मार्ट सिटी’त कोल्हापूरला ठेंगा

By admin | Updated: August 1, 2015 01:02 IST

‘स्मार्ट सिटी’च्या अनुषंगाने आयुक्त पी. शिवशंकर यांनी प्रयत्न केले होते. माजी मंत्री सतेज पाटील यांनी सर्वपक्षीय नगरसेवकांची बैठक घेऊन ‘स्मार्ट सिटी’ योजनेतसाठी सहकार्यचे आवाहन केले होते

कोल्हापूर : केंद्र सरकारने जाहीर केलेल्या ‘स्मार्ट सिटी’ योजनेत कोल्हापूरचा समावेश झाला नाही. या योजनेत सहभागासाठी कोल्हापूर महापालिका प्रशासनाने चिकाटीने प्रयत्न करूनही यश आले नाही. ‘स्मार्ट सिटी’त ठेंगा दाखवण्यात आल्यामुळे महापालिका क्षेत्रामध्ये निराशा पसरली आहे. ‘स्मार्ट सिटी’च्या अनुषंगाने आयुक्त पी. शिवशंकर यांनी विशेष प्रयत्न केले होते. माजी मंत्री सतेज पाटील यांनी सर्वपक्षीय नगरसेवकांची बैठक घेऊन प्रशासनास ‘स्मार्ट सिटी’ योजनेत सहभागासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. प्रशासनानेही सादर केलेल्या निकषांची पुनर्पडताळणी करत त्रुटी राहू नयेत, याची काळजी घेतली होती. राज्यातील इतर महापालिकेच्या स्पर्धेत कोल्हापूर शहर कमी पडले. १०० गुणांपैकी तुलनेत कमी गुण पडल्यानेच शहराचा योजनेत समावेश होऊ शकला नाही. ‘स्मार्ट सिटी’ योजनेतील या शहरांची निवड मुबलक पाणीपुरवठा, अखंड विद्युत पुरवठा, आदी १५ निकषांदारे गुणपद्धतीने वर्गीकरण करून निवड केली आहे. (प्रतिनिधी)सीसी टीव्ही, कचऱ्यापासून वीजनिर्मिती, पंचगंगा प्रदूषण मुक्ती, वायफाय योजना, आदी प्रस्तावित योजनांचा मात्रा लागू झाली नाही. परिणामी शहर स्मार्ट सिटी योजनेपासून लांब राहिल्याची चर्चा आहे.सार्वजनिक वीजपुरवठा, नदी प्रदूषण, पार्किंग व्यवस्थेसाठी बहुमजली पार्किंग व्यवस्था, गरिबांसाठी घरे योजना, पारदर्शक प्रशासन या मुद्द्यावर महापालिका प्रशासन कमी पडले.स्मार्ट सिटी योजनेत कसोशीने प्रयत्न करूनही शहरास स्थान मिळाले नाही याचे दु:ख आहे. सोलापूर वगळता कोणत्याही लहान शहराचा यामध्ये समावेश झालेला नाही. केंद्र व राज्य शासनाच्या इतर अनेक योजनांतून शहरासाठी निधी आणून विकासाचे काम यापुढेही अधिक जोमाने सुरू राहील. स्मार्ट योजनेत सहभाग नसला तरी यातील चांगल्या योजनांचे कामकाज यापुढेही सुरू राहील.- पी. शिवशंकर, आयुक्त, कोल्हापूर महापालिका‘स्मार्ट सिटी’मधून कोल्हापूरला जाणून-बुजून राज्य सरकारने वगळले आहे. त्यामुळे कोल्हापूर शहराच्या विकासावर परिणाम होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातत्याने पश्चिम महाराष्ट्रावर अन्याय करत असून ते पुरते विदर्भवादी आहेत. - हसन मुश्रीफ, आमदार