शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

‘स्मार्ट सिटी’साठी सूचना मागविणार!

By admin | Updated: July 5, 2015 01:11 IST

नागरिकांचा सहभाग घेणार : मंगळवारी, बुधवारी विभागीय कार्यालयात नियोजन

कोल्हापूर : ‘स्मार्ट सिटी’ योजनेत १५ निकषांदारे गुणपद्धतीने वर्गीकरण करून शहरांची निवड होणार आहे. यानंतर या १५ पैकी दहा निकषांवर शहरवासीयांच्या नेमक्या गरजा जाणून घेऊन अग्रक्रमाने निधी कशासाठी हवा आहे, हे शासनास कळवायचे आहे. शहरवासीयांच्या या निकषांनुसार गरजा व सूचना जाणून घेण्यासाठी व मंगळवार व बुधवारी (दि.७ व ८) दोन दिवस विभागीय कार्यालयात थेट सूचना स्वीकारल्या जाणार आहेत. नागरिकांनी उत्स्फूर्तपणे महापालिकेच्या या उपक्रमात सहभाग नोंदवावा, असे आवाहन माजी मंत्री सतेज पाटील यांनी शनिवारी केले. नूतन महापौर वैशाली डकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी सतेज पाटील बोलत होते. बैठकीसाठी उपमहापौर मोहन गोंजारे, आयुक्त पी. शिवशंकर, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त विजय खोराटे, आदींसह नगरसेवक व अधिकारी उपस्थित होते. स्मार्ट सिटीत सहभागी शहरांना दरवर्षी केंद्र व राज्य शासनाकडून असे मिळून १५० कोटी, तर ५० कोटी महापालिकेच्या स्वनिधीतून असा २०० कोटी रुपयांचा निधी पाच वर्षांसाठी मिळणार आहे. योजनेत १५ निकषांद्वारे गुणांकन पद्धतीने शहरांची निवड केली जाणार आहे. या निकषांधारे महापालिकेच्या तयारीचा गुणतक्ता राज्य शासनाकडे १० जुलैपर्यंत पाठविला जाणार आहे; तर निधीची गरज असलेला अहवाल ३० जुलैपर्यंत सादर केला जाणार असल्याची माहिती आयुक्त पी. शिवशंकर यांनी बैठकीत दिली. (प्रतिनिधी)