शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

‘स्मार्ट सिटी’ची लगीनघाई

By admin | Updated: July 7, 2015 01:06 IST

आजपासून सूचना, हरकती स्वीकारणार : ७५० कर्मचारी लागले कामाला; शौचालयांचे घरोघरी सर्वेक्षण

कोल्हापूर : स्मार्ट सिटीसाठी केंद्र शासनाने सुचविलेल्या दहा विषयांवर नागरिक ांच्या अपेक्षा जाणून घेण्याचा प्रयत्न महापालिकेतर्फे आज, मंगळवारपासून केला जाणार आहे. महापालिकेच्या गांधी मैदान, ताराराणी कार्यालय, शिवाजी मार्केट व राजारामपुरी विभागीय कार्यालयात सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत नागरिकांच्या सूचना स्वीकारल्या जाणार आहेत. नागरिकांनी लेखी स्वरूपात सूचना द्यावात, जेणेकरून गरजेच्या अग्रक्रमानुसार निधीबाबत शासनाकडे तक्ता पाठविणे सोपे जाईल, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे. याव्यतिरिक्त २० जुलैपर्यंत नागरिकांना लेखी स्वरूपात सूचना देण्याची मुभा उपलब्ध असणार आहे. देशातील १००, तर राज्यातील दहा शहरांचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश होणार आहे. ३६ महापालिका व आठ ‘अ’ वर्ग नगरपालिका असणारी अशी एकूण ४४ शहरे या स्पर्धेत आहेत. महापालिका प्रशासन, लोकसहभाग, ई-गव्हर्नन्स, वीज, पाणीपुरवठा व बचत, पर्यटन व प्रदूषण मुक्तीबाबत धोरण, आदी मुद्द्यांना अनुसरून गुणानुक्रमे अव्वल दहा ठरणाऱ्या शहरांचा या योजनेत समावेश होणार आहे. राज्यस्तरानंतर केंद्रीय स्तरावर स्पर्धा होऊन यामध्ये अग्रक्रमाने अव्वल ठरणाऱ्या शहरांत सर्वांत प्रथम योजना सुरू केली जाणार आहे. केंद्र व राज्याकडून १५० कोटी, तर मनपाच्या स्वनिधीतून ५० कोटी, असा २०० कोटी रुपयांचा निधी प्रतिवर्षी, असा पाच वर्षांसाठी उपलब्ध होणार आहे.