शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
2
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
3
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
4
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
5
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
6
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
7
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
8
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
9
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
10
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
11
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
12
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
13
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
14
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
15
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
16
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
17
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
18
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
19
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
20
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
Daily Top 2Weekly Top 5

कागलमधील सत्तेसाठी ‘इन्कलाब जिंदाबाद’चा नारा

By admin | Updated: July 6, 2015 00:28 IST

लाला बावटा ग्रामपंचायती लढवणार : तालुक्यातील ५३ गावांत किमान १५ जागा जिंंकण्याची तयारी

दत्तात्रय पाटील - म्हाकवे -कागल तालुक्यात लाल बावटा कामगार संघटनेनेही आगामी ग्रामपंचायतीच्या निवडणुका लढविण्याच्या दृष्टीने मोर्चेबांधणी केली आहे. तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतींमध्ये किमान १० ते १५ सदस्यांची वर्णी लावून संघटनेचे खाते उघडण्याची तयारी केली आहे. त्यादृष्टीने बैठका सुरू आहेत. त्यामुळे पहिल्यांदाच काही ग्रामपंचायतींमध्ये लाल निशाण आणि ‘इन्कलाब जिंदाबाद’चा नारा घुमणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींतील सत्ताधाऱ्यांसह प्रबळ दावेदार गटांनाही लाल निशाण संघटनेला गृहीत धरणे चालणार नाही. काही गावांत या संघटनेतील प्रतिनिधी थेट सत्तेत घेण्यासंबंधी स्थानिक नेतेमंडळींकडून विचारणा होत आहे.जगण्याच्या लढाईत शोषित, दीन-दुबळ्यांसाठी टेकू देणारी आणि जनसामान्यांच्या हितासाठी नेहमीच रस्त्यावर उतरणाऱ्या डाव्या चळवळीचे फार मोठे योगदान आहे. तसेच ऊसदराचा प्रश्न, टोलमुक्ती आंंदोलन यासह अपुरा रेशन पुरवठा, आदी सामाजिक प्रश्नांवर बंड करण्यात डावी आघाडी पुढे असते. मात्र, न्याय मिळेपर्यंत या आघाडीला लाल सलाम केला जातो, अन्यथा सार्वत्रिक निवडणुकांमध्ये या केलेल्या कामाचा आणि जनमताचा प्रभाव दिसत नसल्याचे स्पष्ट दिसून येते. मात्र, गेल्या पाच वर्षांपासून लाल बावटा बांधकाम कामगार संघटनेने इमारत व इतर क्षेत्रातील कामगारांची मोट बांधून कागल तालुक्यातील प्रत्येक गावात आपले वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे. तालुक्यात चार हजारांहून अधिक कामगारांची शासन दरबारी नोंदी असून, ते संघटित झाले आहेत. विशेष बाब म्हणजे कोणत्याही व्यक्तीचा चेहरा पुढे न करता सर्व संघटना एका झेंड्याखाली आली आहे. कागलमध्ये आजपर्यंत कोणत्याही पक्षाला फारसे महत्त्व नव्हते. येथील गटनेता ज्या पक्षात असेल, त्याच पक्षाचे अस्तित्व येथे असते. दरम्यान, हळदी, भडगाव, साके, बानगे, सिद्धनेर्ली, लिंगनूर (कापशी), आदी गावांत सर्वच जागा लढविण्याचे संकेत असून, उर्वरित गावांत जास्तीत जास्त जागा लढविण्यात येणार आहेत. तालुक्यातील कोणत्याही नेत्याला शह देण्यासाठी आम्ही निवडणुका लढविणार नाही, तर लाल बावटा संघटना मजबूत करणे आणि सत्ताधाऱ्यांच्या गैरकारभारावर अंकुश ठेवून शासनाच्या योजनांचा लाभ योग्य लाभार्थ्यांना देण्यासाठीच आमचे प्रयत्न आहेत. गेल्या पाच-सात वर्षांतील आमचे प्रगतिपुस्तक पाहिले, तर आम्हाला या निवडणुकीतील यशाची खात्री यायला हरकत नाही. - कॉ. शिवाजीराव मगदूम, जिल्हा संघटक, लाल बावटा