शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
2
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
3
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
4
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
5
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
6
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
7
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
8
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
9
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
10
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
11
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
12
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
13
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
14
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
15
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
16
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
17
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
18
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
19
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात सहा शाळा अनधिकृत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:11 IST

कोल्हापूर : जिल्ह्यात इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण देणाऱ्या सहा शाळा अनधिकृत आहेत. या शाळांमध्ये प्रवेश घेतल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक ...

कोल्हापूर : जिल्ह्यात इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण देणाऱ्या सहा शाळा अनधिकृत आहेत. या शाळांमध्ये प्रवेश घेतल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी पालक आणि संबंधित संस्थाचालकांची असल्याचे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जूनमध्येच जाहीर केले आहे. शासनाच्या नियमानुसार परवानगी न घेता काही शिक्षण संस्थांनी शाळा सुरू केल्या आहेत. त्यांच्या परवानगीच्या प्रस्तावांना शासनाकडून मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील अशा सहा शाळा अनधिकृत ठरल्या आहेत. शाहूवाडी, पन्हाळा, चंदगड, कागल, हातकणंगले, गडहिंग्लजमधील मराठी, इंग्रजी माध्यमाच्या इयत्ता पहिली ते नववीच्या शाळांचा समावेश आहे. या शाळा सध्या सुरू आहेत. त्यामध्ये सुमारे १ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळा सुरू राहिल्यास बालकांचा मोफत व सक्तीचा कायदा अधिनियम २००९ नुसार कलम १८ (५) अंतर्गत दंड आकारण्याचा इशारा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने दिला आहे. दंड आणि कारवाई टाळण्यासाठी या शाळांनी त्यांच्या विद्यार्थ्यांची नोंद अन्य शाळांमध्ये केली आहे.

चौकट

या शाळांना कारणे दाखवा नोटीस

सध्या जिल्ह्यात सहा शाळा अनधिकृत आहेत. शाळा, वर्ग सुरू करण्यासाठीच्या त्यांच्या परवानगीचे प्रस्ताव शासन दरबारी प्रलंबित आहेत. शासनाकडून परवानगी मिळेपर्यंत या शाळांची अनधिकृत शाळा म्हणूनच नोंद राहणार असल्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी सांगितले.

चौकट

विद्यार्थ्यांची अन्य शाळेत नोंद

शासनाकडून परवानगी मिळेल याच्या प्रतिक्षेत संबंधित शाळांनी विद्यार्थ्यांना प्रवेश दिला आहे. मात्र, या विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी या शाळांनी त्यांच्या विद्यार्थ्यांची आपआपल्या परिसरातील जवळच्या शाळांमध्ये नोंद केली आहे. नोंद केलेल्या शाळांच्या माध्यमातून त्यांच्या परीक्षा घेतल्या जातात.

आकडेवारी दृष्टिक्षेपात

सन २०१९-२० शैक्षणिक वर्षात अनधिकृत शाळा : ६

सन २०२०-२१ शैक्षणिक वर्षात अनधिकृत शाळा : ६