शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
2
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
3
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
4
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
5
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
6
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
7
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
8
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
9
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
10
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
11
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
12
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
13
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
14
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
15
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
16
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
17
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
18
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
19
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
20
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक जिल्ह्यात ‘सिंघम’ अवतरणार; दहाव्या मिनिटाला पोलीस मदत मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:25 IST

कोल्हापूर : कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ मदत हवी असल्यास ११२ डायल करा. अवघ्या दहाव्या मिनिटांत पोलीस घटनास्थळी हजर राहतील. ...

कोल्हापूर : कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ मदत हवी असल्यास ११२ डायल करा. अवघ्या दहाव्या मिनिटांत पोलीस घटनास्थळी हजर राहतील. राज्यासह प्रत्येक जिल्ह्यात ही लवकरच सुरू होणार आहे. गृह विभागाने सध्या अशाच पद्धतीने आधुनिकतेवर भर देत गुन्ह्यांचे प्रमाण कमी करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. या उपक्रमासाठी कोल्हापूर जिल्हा पोलीस दलास चारचाकी व दुचाकी वाहनांची मोठी फौज दिली आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात तात्काळ घटनास्थळी मदतीसाठी ‘सिंघम’ अवतरणार आहे.

राज्यातील पोलीस दलाने आधुनिक यंत्रणेचा वापर करत गुन्हेगारी कमी करण्यावर जास्तीत जास्त भर दिला आहे. ‘११२ डायल’ या नव्या उपक्रमामुळे पोलीस यंत्रणा सक्षम होणार आहे. हा उपक्रम गुन्हेगारांचा कर्दनकाळ ठरणार आहे. राज्य शासनाकडून लवकरच ही योजना कार्यान्वित होत आहे.

पोलीस मदत हवी असल्यास ११२ डायल करा

जिल्ह्यातील कोणत्याही ठिकाणी थांबून ११२ नंबर डायल केल्यास अवघ्या दहाव्या मिनिटांत घटनास्थळी मदतीसाठी पोलिसांची मोबाइल व्हॅन यंत्रणेसह येईल. आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ मदत होणार आहे. ही यंत्रणा २४ तास सतर्क राहणार आहे.

‘कॉल’ येताच कळणार ‘लोकेशन’

राज्यातील कोणत्याही भागातून ११२ नंबरवर येणाऱ्या कॉलचे केंद्रीकरण नवी मुंबई व नागपूर अशा दोन भागात केले आहे. पश्चिम महाराष्ट्रासाठी नवी मुंबई हे मुख्य नियंत्रण कक्ष आहे. कोल्हापुरातून ११२ ला डायल केल्यास तो कॉल प्रथम नवी मुंबईतील नियंत्रण कक्षात जाईल तेथून कोल्हापुरातील नियंत्रण कक्षात कॉलचे लोकशन दाखवले जाईल. ज्या भागातून कॉल आला, त्या परिसरातील पोलिसांच्या बीटमार्शल मोबाइल व्हॅनला संदेश देऊन ते तात्काळ घटनास्थळी पोहोचेल व दहा मिनिटांतच पीडितेला मदत मिळेल.

१६ चारचाकी, ३५ दुचाकी

कोल्हापूर जिल्हा पोलीस दलात दि. १३ एप्रिल रोजी १६ चारचाकी व ३५ दुचाकी नव्याने वाहने दाखल झाली. ही वाहने फक्त ११२ डायल उपक्रमासाठीच वापरायची आहेत. या वाहनांना तात्काळ चालकही उपलब्ध करून दिलेले आहेत.

११६ कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण

जिल्हा पोलीस दलातील ११६ पोलिसांना ‘११२ डायल’ या उपक्रमासाठी प्रशिक्षण दिले. आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ मदत कशी करावी. याबाबत जिल्ह्या-जिल्ह्यात पोलिसांना प्रत्येकी आठ दिवसांचे विशेष प्रशिक्षण दिले आहे.

कोट...

राज्य शासनाच्या गृह विभागाकडून ११२ डायल हा उपक्रम लवकरच कार्यान्वित होत आहे. यासाठी कोल्हापूर पोलीस दलात वाहने दाखल झाली. पीडिताने ११२ ला डायल केल्यास त्याला अवघ्या दहा मिनिटांतच घटनास्थळीच मदत मिळणार आहे. या उपक्रमामुळे गुन्हेगारीला आळा बसेल.

- शैलेश बलकवडे, पोलीस अधीक्षक, कोल्हापूर जिल्हा.

पॉइंटर...

- पोलीस स्टेशन : ३१

- पोलीस चौक्या : ३०

- पोलीस अधिकारी : २५५

- पोलीस कर्मचारी : २७५३

फोटो नं. २४०५२०२१-कोल-पोलीस०१,०२

===Photopath===

220521\22kol_4_22052021_5.jpg~220521\22kol_5_22052021_5.jpg

===Caption===

फोटो नं. २४०५२०२१-कोल-पोलीस०१,०२~फोटो नं. २४०५२०२१-कोल-पोलीस०१,०२