करूळ, भुईबावडा घाटमार्गांची सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 19:02 IST2025-06-18T19:01:54+5:302025-06-18T19:02:46+5:30
गगनबाबडा : करूळ घाटात सोमवारी सकाळी दरड कोसळून सुमारे सात तास वाहतूक ठप्प झाली होती. या पार्श्वूमीवर सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी ...

छाया-प्रकाश काळे
गगनबाबडा : करूळ घाटात सोमवारी सकाळी दरड कोसळून सुमारे सात तास वाहतूक ठप्प झाली होती. या पार्श्वूमीवर सिंधुदुर्गचेजिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी काल, मंगळवारी (दि.१७) सायंकाळी एनडीआरएफ च्या टीमसह करूळ व भुईबावडा घाटांची पाहणी केली. यावेळी प्रांताधिकारी जगदीश कातकर, वैभववाडी तहसीलदार सूर्यकांत पाटील, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे पवन पाटील, वैभववाडी सार्वजनिक बांधकाम उपअभियंता व्ही. व्ही. जोशी, तसेच एनडीआरएफच्या चौदा जवान होते.
संपूर्ण करूळ घाट नूतनीकरणानंतरचा हा पहिलाच पावसाळा असल्याने घाटमार्गात कोसळणाऱ्या दरडींचा धोका ओळखून करूळ व भुईबावडा या घाटांची पाहणी करून रस्त्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक त्या ठिकाणी संरक्षक लोखंडी जाळी बसविणे, पावसाळ्यात दरड कोसळल्यास तातडीने दरड हटविण्यासाठी सर्व यंत्रणा तत्पर ठेवणे, तसेच अपघात टाळण्यासाठी दरड कोसळलेल्या ठिकाणी असणारी रस्त्यावरील माती हटवून रस्ता स्वच्छ करण्याच्या सूचना सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग व सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांना केल्या.