शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये INDIA आघाडीत फूट? जागावाटप अन् CM चेहऱ्यावरून काँग्रेस-आरजेडीत घमासान
2
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
3
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
6
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
7
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
8
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
9
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
10
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
11
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
12
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
13
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
14
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
15
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
16
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
17
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
18
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!
19
मतचोरी करूनच मोदी पंतप्रधान आणि फडणवीस मुख्यमंत्री झालेत..; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आरोप
20
IND vs AUS 1st ODI : टीम इंडियाला पराभवाचा धक्का; ऑस्ट्रेलियानं पर्थच्या मैदानात जिंकला पहिला सामना

Navratri -शारदीय नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर सिंहवाहिनी दुर्गा... अंबाबाईची प्रतिकृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 15:15 IST

शारदीय नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर कुंभार गल्ल्यांमध्ये दुर्गेच्या मूर्ती घडविण्याची लगबग सुरू आहे. सिंहवाहिनी दुर्गा, महिषासुरमर्दिनी, श्री अंबाबाईची प्रतिकृती, बंगाली पद्धतीच्या कोरीव मूर्ती अशा विविध प्रकारांतील मूर्ती घडविल्या जात आहेत.

ठळक मुद्देशारदीय नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर सिंहवाहिनी दुर्गा... अंबाबाईची प्रतिकृती कुंभार बांधवांकडून मूर्तींची घडवणूक

कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर कुंभार गल्ल्यांमध्ये दुर्गेच्या मूर्ती घडविण्याची लगबग सुरू आहे. सिंहवाहिनी दुर्गा, महिषासुरमर्दिनी, श्री अंबाबाईची प्रतिकृती, बंगाली पद्धतीच्या कोरीव मूर्ती अशा विविध प्रकारांतील मूर्ती घडविल्या जात आहेत.महापुराचा फटका बसलेल्या कुंभार बांधवांचा गणेशोत्सव यंदा पाण्यात गेला आहे. त्याची धास्ती अजूनही मनातून गेली नसल्याने काही कुंभारांनी दुर्गेच्या मूर्ती घडविल्या नाहीत. सार्वजनिक मंडळांकडून गणेशमूर्तींप्रमाणे मोठ्या संख्येने देवीच्या मूर्तींची प्रतिष्ठापना केली जात नाही.

आसुराचा संहार करून जगाचे पालन करणाऱ्या या स्त्रीशक्तीचे नवरात्रौत्सवातील धार्मिक विधी कडक असतात; शिवाय घटस्थापना, रोजची पूजा, विधी, जागर या गोष्टी चोखपणे पार पाडाव्या लागतात. त्यामुळे वर्षानुवर्षे या नवरात्रौत्सव साजरा करणाºया मंडळांकडूनच दुर्गेच्या मूर्तींची प्रतिष्ठापना केली जाते.कोल्हापूर शहरात २०० ते ३०० मंडळांकडून दुर्गेच्या मूर्ती प्रतिष्ठापित केल्या जातात. नवरात्रौत्सवाला आता अवघे नऊ दिवस राहिल्याने या दुर्गेच्या मूर्ती घडविण्यासाठी कुंभार बांधवांची लगबग सुरू आहे. शाहूपुरी कुंभार गल्ली, गंगावेश, बापट कॅम्प येथील मोजक्या कुंभारांकडून या मूर्ती बनविल्या जात आहेत.महापूर गेला असला तरी आता पुन्हा हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिल्याने आणि गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा सुरू झालेल्या पावसाच्या तडाख्यामुळेअजूनही कुंभारांमध्ये धास्ती आहे. त्यात मूर्ती वाळण्यासाठीही कमी कालावधी राहिल्याने यंदा मूर्ती कमी प्रमाणात घडविल्या जात आहेत.दरवर्षीप्रमाणे यंदाही सिंहवाहिनी दुर्गेच्या मूर्तींना अधिक मागणी आहे. या मूर्ती अगदी दोन-अडीच फुटांपासून ते सात-आठ फुटांपर्यंत आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची प्रतिकृती बनविण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या मूर्तीही सुबक रीतीने आकाराला येत आहेत. बारीक कलाकुसर असलेल्या बंगाली पद्धतीेच्या मोठ्या मूर्ती भाविकांना भुरळ घालतात. यंदा या मूर्तींचे प्रमाण तुलनेने कमी आहे.

दुर्गेच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करणाऱ्या मंडळांची संख्या कमी आहे. त्यात यंदा महापुराचाही परिणाम मंडळांवर आणि मूर्ती बनविण्यावर झाला आहे. आत्ता हळूहळू मूर्तींची चौकशी सुरू झाली आहे.- संभाजी माजगांवकर,मूर्तिकार संघटना

 

 

 

 

टॅग्स :Navratriनवरात्रीkolhapurकोल्हापूर