आजऱ्याचा आठवडी बाजार शुक्रवारीच सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:55 IST2020-12-05T04:55:14+5:302020-12-05T04:55:14+5:30

आजरा : आजऱ्याचा आठवडी बाजार शुक्रवारीच सुरू करून नागरिकांची सोय करावी. शुक्रवारचा आठवडी बाजार बंद असल्यामुळे सर्वसामान्य लोकांचे आर्थिक ...

Sick Week Market starts on Friday | आजऱ्याचा आठवडी बाजार शुक्रवारीच सुरू करा

आजऱ्याचा आठवडी बाजार शुक्रवारीच सुरू करा

आजरा :

आजऱ्याचा आठवडी बाजार शुक्रवारीच सुरू करून नागरिकांची सोय करावी. शुक्रवारचा आठवडी बाजार बंद असल्यामुळे सर्वसामान्य लोकांचे आर्थिक नुकसान गेले आठ ते दहा महिने सुरू आहे ते थांबवावे, अशी मागणी मराठा महासंघाच्यावतीने करण्यात आली आहे.

कोरोना काळात केंद्र व राज्य सरकारच्या सूचनेनुसार सर्व ठिकाणचे आठवडी बाजार बंद होते. सध्या राज्य सरकारने सर्व व्यवहार सुरळीत करून आठवडी बाजार सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आजऱ्याशेजारील गडहिंग्लज, नेसरीचा बाजार सुरू झाला आहे.

आजऱ्याचा आठवडी बाजार शुक्रवारी सुरू करून जवळपासच्या खेडे गावातील लोकांची सोय करावी, अशीही मागणी मराठा महासंघाने केली आहे. याबाबतचे निवेदन आजरा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अजिंक्य पाटील यांना दिले आहे.

यावेळी मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष मारुती मोरे, उपाध्यक्ष बंडोपंत चव्हाण, सरचिटणीस बंडोपंत कातकर, संभाजी इंजल, शिवाजी गुडूळकर, शंकरराव शिंदे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

---------------------

फोटो ओळी : आजऱ्याचा आठवडी बाजार शुक्रवारीच सुरू करावा या मागणीचे निवेदन मुख्याधिकारी अंजिक्य पाटील यांना देताना मराठा महासंघाचे पदाधिकारी.

क्रमांक : ०३१२२०२०-गड-०६

Web Title: Sick Week Market starts on Friday