शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

ऐन दिवाळीदिवशी रस्त्यावरील खड्ड्यांत अभ्यंगस्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2020 6:35 PM

roadsefty, kolhapurnews, morcha कोल्हापूर शहरभर आनंदाचा, मांगल्याचा सण म्हणून दिवाळी धुमधडाक्यात साजरी होत असताना शनिवारी पहाटे फुलेवाडी रिंग रोडवर क्रांतिसिंह नाना पाटील नगर परिसरात खड्ड्यांचा निषेध नोंदवत नागरिकांनी खड्ड्यातच अभ्यंगस्नान केले. क्रांतिसिंह नाना पाटील नगर कृती समितीच्या वतीने माजी नगरसेवक अमोल माने, सुहास आजगेकर, समीर वर्णे यांनी आंदोलनात सहभाग नोंदविला. ​​​​​​​

ठळक मुद्दे रिंग रोडवरील खड्ड्याचा नोंदवला अनोखा निषेध क्रांतिसिंह नाना पाटील नागरी कृती समितीचे आंदोलन

कोल्हापूर : शहरभर आनंदाचा, मांगल्याचा सण म्हणून दिवाळी धुमधडाक्यात साजरी होत असताना शनिवारी पहाटे फुलेवाडी रिंग रोडवर क्रांतिसिंह नाना पाटील नगर परिसरात खड्ड्यांचा निषेध नोंदवत नागरिकांनी खड्ड्यातच अभ्यंगस्नान केले. क्रांतिसिंह नाना पाटील नगर कृती समितीच्या वतीने माजी नगरसेवक अमोल माने, सुहास आजगेकर, समीर वर्णे यांनी आंदोलनात सहभाग नोंदविला.फुलेवाडीपासून नवीन वाशीनाकापर्यंत पावसाळ्यानंतर रिंग रोडचे डांबरीकरण करण्यात आले; पण क्रांतिसिंह नाना पाटील नगरपासून जुना रिंग रोड खड्डेमय ठेवून नवीन रोडचे डांबरीकरण करण्यात आले; त्यामुळे या जुन्या मार्गावरील कणेरकरनगर, लक्ष्मीबाई साळोखे कॉलनी, अरुण सरनाईकनगर, निचितेनगर या कॉलन्यांतील नागरिकांना ये-जा करण्यात तसेच खड्ड्यांमुळे धुळीचा मोठा त्रास होत आहे. या रस्त्याच्या डांबरीकरणामध्ये महापालिका प्रशासनाने सोईस्कर दुर्लक्ष केले आहे.

त्या निषेधार्थ क्रांतिसिंह नाना पाटील नगर नागरी कृती समितीच्या वतीने ऐन दिवाळीच्या पहाटे शनिवारी या रस्त्यावरील खड्ड्यातच अभ्यंगस्नान करून प्रशासनाचा धिक्कार करण्यात आला. खड्ड्यांना रांगोळीने सजावट करून त्यामध्ये हे अभ्यंगस्नान झाले. यंदाची दिवाळी खड्ड्यात , महापालिका प्रशासनाचा धिक्कार असो, अशा घोषणा दिल्या. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना अटकाव करण्याचा प्रयत्न केला; पण जमावबंदीचे निर्देश पाळत कृती समितीने हे आंदोलन केल्याने पोलिसांनाही काहीही करता आले नाही. कोल्हापुरातील फुलेवाडी रिंग रोडवरील क्रांतिसिंह नाना पाटीलनगर ते नवीन वाशी नाका या जुन्या रिंग रोडचे डांबरीकरण न केल्याच्या निषेधार्थ नागरी कृती समितीच्या वतीने ऐन दिवाळीदिवशी शनिवारी या रस्त्यावरील खड्ड्यातच अभ्यंगस्नान करण्याचे अनोखे आंदोलन करीत महापालिकेचा धिक्कार नोंदविला. 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाMorchaमोर्चाkolhapurकोल्हापूरDiwaliदिवाळी